ETV Bharat / sports

बांगलादेशसमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 9:26 AM IST

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 चा सुपर-8 सामना आज टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य प्लेइंग-11 वर नजर टाकू.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सध्या सुपर-8 फेरीचे सामने खेळले जात आहेत. सुपर-8 फेरीतील दुसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सामन्यात टीम इंडिया बांगलादेश संघाशी भिडणार आहे. सुपर-8 फेरीतील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियानं सुपर-8 मधील पहिला सामना जिंकल्यानं आणखी एका विजयासह रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचेल. मात्र दुसऱ्या बाजुला सुपर-8 मधील पहिला सामना गमावल्यानं आता बांगलादेशसाठी 'करो या मरो' अशी स्थिती आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिली तर टीम इंडिया पूर्णपणे वरचढ आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात टीम इंडियानं 12 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेश संघाला आतापर्यंत फक्त 1 सामना जिंकता आला. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा भिडले. या काळात टीम इंडियानं सर्व सामने जिंकले आहेत. बांगलादेशनं टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला अद्याप पराभूत केलेलं नाही.

सुपर-8 मध्ये दोन्ही संघांची कामगिरी : सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. याआधी ग्रुप स्टेजमध्येही टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघानं आयर्लंडचा 8 गडी राखून, पाकिस्तानचा 6 धावांनी आणि अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केलाय. तर बांगलादेशला सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 गडी राखून, नेदरलँडचा 25 धावांनी तर नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. याशिवाय बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर : बांगलादेशविरुद्धच्या आजच्या महत्वाच्या सामन्यात धावा करण्याची जबाबदारी फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्यावर असेल. सूर्यकुमार यादवनं 4 सामन्यात 112 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात त्यानं 53 धावांची इनिंग खेळली. तर गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल.

बांगलादेशच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर : बांगलादेशला हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं. तौहीद हृदोयनं बांगलादेशसाठी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी केलीय. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं 5 सामन्यात 135 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं 40 धावा केल्या. बांगलादेशचे वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन यांच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. बांगलादेशची कमजोरी म्हणजे त्यांची फलंदाजी. बांगलादेशचे फलंदाज 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

दोन्ही संघांचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

बांगलादेश संघ : तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), शकीब अल हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, जखार अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झीम शकीब.

हेही वाचा

  1. दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडच्या जबड्यातून हिसकावला विजयाचा 'घास'; हॅरी ब्रूकची झंझावाती खेळी व्यर्थ - T20 World Cup 2024
  2. कोहलीच्या 'या विराट' विक्रमाची सूर्यानं त्याच्यापेक्षा निम्मे सामने खेळून केली बरोबरी - Player of The Match Awards
  3. पॅट कमिन्ससह 'या' सात गोलंदाजांनी केली टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक; कोणी कधी केला हा पराक्रम? - T20 World Cup Hat Tricks
  4. भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी अपात्र झालेल्या वेस्ट इंडिजनं 49 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास - ODI Cricket World Cup 1975

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.