ETV Bharat / sports

'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल; आज मुंबईत निघणार भव्य विजयी मिरवणूक, 'हे' रस्ते असणार बंद! - Team India Victory Rally

T20 World Cup 2024 Victory Rally : टी20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धुळ चारून इतिहास घडवल्यानंतर आज (4 जुलै) विजयी टीम इंडियाचं भारतामध्ये आगमन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये विश्वविजेत्या टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे.

T20 World Cup 2024 Victory Rally in Mumbai today
टीम इंडिया विजयी मिरवणूक (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 7:39 AM IST

मुंबई T20 World Cup 2024 Victory Rally : विश्वविजेती टीम इंडिया ही चमचमती ट्रॉफी घेऊन आज (4 जुलै) मायदेशी परतली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालं. यावेळी क्रिकेटप्रेमींनी जल्लोषात खेळाडूंचं स्वागत केलं. दरम्यान, आज मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघणार आहे. यादरम्यान कोणकोणते मार्ग बंद असतील याविषयी जाणून घ्या.

मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल : टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. तसंच मिरवणुकीदरम्यान लोकलचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. रॅली निमित्त NCPA ते मेघदूत ब्रीजपर्यंत मरीन ड्राईव्हच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1 (Source reporter)
  • चर्चगेट स्थानकापासून सुंदरमहल जंक्शनपर्यंत आणि वीर नरिमन रोडची उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलीय. तर दिनशॉ वच्छा मार्ग WIAA चौक ते रतनलाल बाबुना चौकची (मरीन प्लाझा जंक्शन) उत्तर वाहिनीही वाहतुकीसाठी बंद असेल. मादाम कामा रोड मंत्रालय जंक्शन ते एअर इंडिया बिल्डिंगपर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग फ्री प्रेस जर्नल जंक्शन ते एन एस रोड पर्यंत उत्तर वाहिनीही वाहतुकीसाठी बंद असेल. तसंच विनय के शहा मार्ग, जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद असतील. तर यादरम्यान कोस्टल रोड सुरू राहणार आहे. पण कोस्टल रोडवरून येणारी वाहतूक मेघदूत ब्रीजवरून (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रीज) वळवण्यात येईल.
  • एन एस रोड, वीर नरिमन रोड, मादाम कामा रोड, फ्री प्रेस जर्नल मार्ग, दिनशॉ वाच्छा मार्ग, महर्षी कर्वे रोड, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, रामनाथ गोयंका मार्ग, विनय के शहा मार्ग आणि जमनालाल बजाज मार्ग हे नो पार्किंग झोन ठेवण्यात आलेत. तर पर्यायी मार्ग म्हणून केम्स कॉर्नर ब्रिज येथून डावे वळण घेऊन नाना चौक इथून पुढं इच्छित स्थळी जाता येईल. आरटीआय जंक्शन येथून डावे वळण घेऊन एन एस पाटकर मार्ग, पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) डावे वळण.एस.व्ही.पी रोड, तसंच पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) येथे उजवे वळण घेवून महर्षी कर्वे मार्गानं पुढं इच्छित स्थळी जाता येईल.

हेही वाचा -

  1. मायदेशात परतल्यावर कसं होणार विश्वविजेत्यांचं स्वागत? 17 वर्षांपूर्वीचा 'तो' क्षण पुन्हा अनुभवता येणार - Team india Prade
  2. 'कमबॅक' करावा तर असा...! आयपीएलमध्ये हुटींगचा बळी ठरलेल्या पांड्यानं रचला इतिहास; 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - ICC Rankings
  3. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.