ETV Bharat / sports

T20 मालिकेतील पराभवानंतर विश्वविजेते वनडेत पुनरागमन करणार? भारतात 'इथं' दिसेल लाईव्ह सामना

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होता आहे. यातील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 6 hours ago

SL vs WI 1st ODI Live Streaming
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (AP Photo)

पल्लेकेले (श्रीलंका) SL vs WI 1st ODI Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आज 20 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होईल. मालिकेतील पहिला सामना रविवारी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.

16 सदस्यीय श्रीलंका संघाची घोषणा : या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यात चारिथ असलंका यांच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी चमिका करुणारत्नेच्या जागी वेगवान गोलंदाज चामिंडू विक्रमसिंघेचा श्रीलंकेच्या 16 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. वनडे मालिकेसाठी शाई होप वेस्ट इंडिजचा कर्णधार असेल तर चारिथ असलंका श्रीलंकेचा कर्णधार असेल. उभय संघांमध्ये नुकत्याच झालेल्या T20 मालिकेत श्रीलंकेनं 2-1 नं विजय मिळवला होता.

T20 मालिकेत पराभवानंतर वनडेत करणार पुनरागमन : दुसरीकडे, तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला पुनरागमन करायचं आहे. वेस्ट इंडिजचं नेतृत्व शाई होपकडे असेल, तर वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. 17 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ज्वेल अँड्र्यूचा वेस्ट इंडिजच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. शाई होप आणि अल्झारी जोसेफ व्यतिरिक्त, ब्रँडन किंग, एविन लुईस, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर हे कॅरेबियन संघाचे काही अनुभवी खेळाडू आहेत.

दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 64 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंकेच्या संघानं 30 सामने जिंकले असून वेस्ट इंडिजनं 31 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. श्रीलंकेच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 17 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत श्रीलंकेनं 12 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. 2 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. या मालिकेत श्रीलंकेचा वरचष्मा राहिला आहे.

दोन संघांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोणते : सनथ जयसूर्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. सनथ जयसूर्यानं 30 सामन्यांच्या 30 डावात 922 धावा केल्या होत्या तर दोन वेळा नाबाद राहिला होता. सनथ जयसूर्याशिवाय अर्जुन रणतुंगानं 22 सामन्यांत 50.40 च्या सरासरीनं 756 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजसाठी, ब्रायन लारानं श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25 सामन्यांमध्ये 48.78 च्या सरासरीनं 1,122 धावा केल्या होत्या. ब्रायन लारा व्यतिरिक्त शिवनारायण चंद्रपॉलनं 20 सामन्यांत 680 धावा केल्या आहेत.

कोणत्या गोलंदाजांनी घेतल्या सर्वाधिक विकेट : श्रीलंकेसाठी, मुथय्या मुरलीधरननं वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरननं 27 सामन्यांत 34 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत सनथ जयसूर्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनथ जयसूर्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या 30 सामन्यांत 29 बळी घेतले होते. कोर्टनी वॉल्श हा वेस्ट इंडिजकडून श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कोर्टनी वॉल्शनं 22 सामन्यांत 25.88 च्या सरासरीनं 26 विकेट घेतल्या. कोर्टनी वॉल्शशिवाय ओटिस गिब्सन आणि कार्ल हूपरनं प्रत्येकी 19 विकेट घेतल्या.

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 20 ऑक्टोबर (रविवार) रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले इथं दुपारी 02:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02.00 वाजता होईल.

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना कुठं आणि कसा पाहायचा?

भारतात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. जे सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनलवर पहिल्या वनडे सामन्याचं प्रसारण प्रदान करेल. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड आणि सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर केलं जाईल.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ :

श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, सदिरा समरविक्रमा (यष्टिरक्षक), निशान मदुष्का (यष्टिरक्षक), दुनिथ वेलालगे, वानिंदू हसरंगा, महेश कुमारी, जेफ्री वेंडरसे, चामिडू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका आणि मोहम्मद शिराज.

वेस्ट इंडिजच : शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), ज्वेल अँड्र्यू (यष्टीरक्षक), ॲलेक अथनाझी, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर.

हेही वाचा :

  1. श्रीलंकेकडून दोन वेळच्या विश्वविजेत्यांचा पराभव; 21 वर्षांच्या आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं
  2. सर्फराज खाननं 'कीवी' गोलंदाजांना पाजलं पाणी; 'अशी' कामगिरी करणारा भारताचा 22वा खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.