मुंबई - निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण ओटीटी प्लेटफॉर्म 'अल्ट बालाजी'ची वेब सीरीज 'गंदी बात' सीजन 6 बरोबर जुळलेलं आहे. 'गंदी बात' या कामुक वेब सीरीजमध्ये एका अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह दृश्ये चित्रित केल्याचा आरोप करण्यात आला होता. आत्तापर्यंत या वेब सीरीजचे 6 सीझन आले आहेत. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर कायदेशीर अडचणीत अडकल्याच्या दिसत आहेत. फेब्रुवारी 2021 ते, एप्रिल 2021 दरम्यान 'अल्ट बालाजी'वर प्रसारित झालेल्या या वेब सीरीजवर अनेक लोकांना आक्षेप घेतला होता.
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर आल्या अडचणीत : 'गंदी बात' सीजनसाठी अनेकांनी एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार "गंदी बात' सीझन 6' या वेब सीरीजमध्ये सिगारेटच्या जाहिराती वापरून महापुरुष आणि संतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत." याशिवाय वेब सीरीजच्या एका भागात पोस्कोच्या नियमांचे उल्लंघन करणारे काही दृश्येही दाखवण्यात आले आहेत. सर्व आरोपांवर नजर टाकल्यास असं दिसून येत आहे, की माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, महिला प्रतिबंध कायदा 1986 आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा 2003 सारख्या कायद्यांचेही या सामग्रीमुळे उल्लंघन झालंय.
न्यायालयाचा निर्णय : या प्रकरणी एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही. मुलांवर बनवलेल्या अश्लील चित्रपटांबाबत न्यायालयानं नुकत्याच केलेल्या निर्णयानंतर या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं लहान मुलांशी संबंधित अश्लील मजकुराबाबत मोठा निर्णय दिल्यानंतर, या दोघींही अडचणीत सापडल्या होत्या. मुलांसाठी असा अश्लील मजकूर पाहणं, प्रकाशित करणं आणि डाऊनलोड करणं, हा गुन्हा असल्याचं न्यायालयानं सांगितलं होतं. एकता कपूर बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह हेड आहेत. याशिवाय तिची आई शोभा कपूर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.