ETV Bharat / state

कस्टम विभागाची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर तब्बल 1.45 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त - CUSTOM DEPARTMENT

मुंबईच्या कस्टम विभागानं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1.45 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Custom Department seized more than one crore of drugs at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2024, 1:30 PM IST

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकमधून आलेल्या एका प्रवाशाकडून एक दोन नाही तर तब्बल 1.45 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थात 1.45 कोटी रुपयांचा गांजा असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या प्रवाशानं मोठ्या चतुराईनं कोणालाही संशय येऊ नये, याकरिता व्हॅक्यूम-शीलबंद पॅकेटमध्ये गांजा लपवला होता, अशी माहिती कस्टम विभागानं दिली आहे.

कस्टम विभागाची कारवाई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील महिन्यात कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता शनिवारी (19 ऑक्टोबर) बँकॉकमधून आलेल्या एका प्रवाशाकडून 1.45 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. 1962 सीमाशुल्क कायदा आणि 1985 एनडीपीएसनुसार अमली पदार्थ कायद्याअंतर्गत आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कस्टम विभागाचे अधिकारी करत आहेत. तर अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी कस्टम विभागानं मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.

सुरक्षा वाढवली : 14 ऑक्टोबर रोजीदेखील मुंबई विमानतळावर अशीच घटना घडली होती. यावेळी सीमा शुल्क विभागानं पाच किलो गांजा जप्त केला होता. खाद्यपदार्थाच्या पाकीटमध्ये हा गांजा लपवला होता. परंतु, तपासादरम्यान हे सीमाशुल्क विभागाच्या निदर्शनास आल्यामुळं त्या प्रवाशावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा आणि कस्टम विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती कस्टम विभागानं दिली आहे.

हेही वाचा -

  1. पठ्ठ्यानं पोस्टानं गुवाहाटीवरुन मागवलं चक्क हेरॉईन, क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट; पुढं काय घडलं? वाचा सविस्तर - Man Demands Heroin From Guwahati
  2. गुजरात ATS ची मोठी कारवाई; भिवंडीतून 800 कोटीचं ड्रग्ज जप्त, दोघांना अटक - ATS Gujarat On Drugs Case
  3. अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल; चौकशी करताच डीआरआयचे अधिकारी चक्रावले - DRI Seized Cocain

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.