कोलंबो Sri Lanka Squad Announced : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा क्रिकेट संघ संघ जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट निवड समितीनं या मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची निवड केली आहे. ही दोन सामन्यांची मालिका ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलचा भाग आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. मात्र ही मालिका फायनलचं थोडं स्पष्ट चित्र देऊ शकते. WTC गुणतालिकेत सध्या श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
Slow left-arm orthodox back in Sri Lanka’s Test team after two years for the #WTC25 series against South Africa 👤🏏#SAvSL | More ⬇️https://t.co/BpIyPHn194
— ICC (@ICC) November 19, 2024
कधीपासून होणार मालिका : ही कसोटी मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेचा यजमान दक्षिण आफ्रिका आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीड इथं होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 5 डिसेंबरपासून गाकबेर्हा इथं खेळवला जाणार आहे. गेल्या आठवड्यात, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी प्री-सीरिज कॅम्पमध्ये भाग घेण्यासाठी श्रीलंकेचे दहा खेळाडू दक्षिण आफ्रिकेला गेले होते. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार धनंजय डी सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल आणि प्रभात जयसूर्या हे 10 खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनला रवाना झाले आहेत, जिथं खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि सरावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आफ्रिकेत इतिहास रचण्यास श्रीलंका सज्ज : श्रीलंका क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे की या मालिकेतील उर्वरित खेळाडू 22 नोव्हेंबर 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. त्यांना सरावासाठी काही दिवस मिळतील आणि त्यानंतर ते पहिल्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध होतील. सनथ जयसूर्या जेव्हापासून श्रीलंका संघाचा प्रशिक्षक झाला, तेव्हापासून त्यानं संघात नवीन आत्मविश्वास भरला आहे. जर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतही संघाला यश मिळवून दिलं तर ते त्याच्यासाठी आणि संघासाठी खूप चांगलं असेल. विशेष म्हणजे या 17 सदस्यीय संघात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेला वनडे मालिका जिंकवून देणारा कर्णधार चरिथ असलंका याचा मात्र या कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
Sri Lanka have named a 17-member squad for the two-Test series against South Africa #SAvSL pic.twitter.com/nrUJ0VdZyd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 19, 2024
श्रीलंकेचा कसोटी संघ पुढीलप्रमाणे : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडीमल, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, ओशादा फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, लसिथ एम्बुल्डेनिया, विलनानंद फर्नांडो, लासिथ एम्बुल्देनिया, मिलन फरनांडो, लसिथ फर्नांडो, लहिरु कुमारा आणि कसून राजिथा
हेही वाचा :