कोलंबो Squad Announced for New Zealand Series : श्रीलंका क्रिकेट संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध 2 सामन्यांची T20I आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी श्रीलंकेनं आपल्या संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि T20 मालिकेत चरिथ असलंकाला श्रीलंका संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. श्रीलंकेनं दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुभवी संघ निवडले आहेत, ज्यात अनेक खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांनी घरच्या मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Sri Lanka name experienced outfits for their ODI and T20I series against New Zealand at home.#SLvNZhttps://t.co/L6NDnt6fwi
— ICC (@ICC) November 6, 2024
कसा असेल कीवी संघाचा दौरा : न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा 9 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात 2 T20I सामने आणि 3 वनडे सामने खेळवले जातील. 9 आणि 10 नोव्हेंबरला T20I सामने खेळवले जातील, तर तीन वनडे सामने 13, 17 आणि 19 नोव्हेंबर 2024 रोजी खेळवले जातील. पहिले तीन सामने दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, तर शेवटचे दोन वनडे सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ पुढीलप्रमाणे :
- श्रीलंकेचा एकदिवसीय संघ : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल परेरा, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, सदिरा समराविक्रामा, निशान मदुष्का, दुनिथ वेललेगे, वानिंद हसरांगा, वानिश हसरांगे, वानिश हसरांगे, जेम्स चॅरिंगे, चॅरसेन, चॅरिंथ असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, मोहम्मद शिराज.
- श्रीलंकेचा T20I संघ : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दिनेश चंडिमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महिष थेक्षाना, दुनिथ च्वान्रे, शाना, दुनिथ मथिशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो.
Touchdown in Sri Lanka! The group of players and staff involved in the India Test series have arrived in Colombo ahead of the T20I and ODI series against @OfficialSLC starting in Dambulla this weekend 🏏 #SLvNZ #CricketNation #Cricket 📸 = SLC pic.twitter.com/b7tBwPNH4i
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 6, 2024
न्यूझीलंडचा श्रीलंकेत पोहोचला : या दौऱ्यासाठी न्यूझीलंडनं आधीच आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंड संघाची कमान मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी, न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ सप्टेंबरमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने आले होते. यात यजमान श्रीलंका संघानं 2-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर न्यूझीलंडनं त्यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मोहीम सुरु ठेवण्यासाठी भारताचा दौरा केला. या दौऱ्यात न्यूझीलंडनं भारताचा 3-0 असा क्लीन स्वीप करुन नवा इतिहास रचला होता.
श्रीलंका दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, जॅक फॉक्स, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टी. नॅथन स्मिथ, ईश सोधी, विल यंग.
हेही वाचा :