ETV Bharat / sports

"स्वप्निलच्या यशानंतर राज्य सरकार 'मिशन लक्ष्यवेध'ला देणार बळ"- क्रीडामंत्री संजय बनसोड - Sanjay Bansode On Paris Olympics

Sanjay Bansode News : स्वप्निल कुसाळे यानं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवून भारताचा मान उंचावला आहे. बहात्तर वर्षानंतर मिळालेल्या या वैयक्तिक पदकानं आता क्रीडापटूंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. क्रीडापटूंना बळ देण्यासाठी राज्य सरकारनेही 'मिशन लक्ष्यवेध' ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

Sanjay Bansode
क्रीडामंत्री संजय बनसोड, नेमबाज स्वप्निल कुसाळे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 4:24 PM IST

मुंबई Sanjay Bansode News : महाराष्ट्रातील अनेक क्रीडापटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. मात्र या क्रीडापटूंना अधिकारी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि खेळासाठी पोषक वातावरण तयार करून देणं यात अजूनही राज्याच्या वतीनं फारसे प्रयत्न होताना दिसत नाही, अशी चर्चा सुरू आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे यानं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदक पटकावून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. स्वप्निलच्या या यशानंतर आता महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्याचं वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी दिली.

क्रीडामंत्री संजय बनसोड यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

'मिशन लक्षवेध' अधिक प्रभावीपणे राबवणार : "राज्य सरकारनं राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'मिशन लक्षवेध' ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार बारा खेळ निश्चित केले गेले आहे. यामध्ये बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, आर्चरी, शूटिंग, कुस्ती, हॉकी, बॅडमिंटन, सेलिंग, रोइंग, टेबल टेनिस आणि लॉन टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांच्या दर्जा उंचावण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 'हाय परफॉर्मन्स सेंटर' उभे करण्यात येणार आहेत तर विभागीय स्तरावर 36 ठिकाणी स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि प्रत्येक जिल्ह्यात 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करून दहा टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आहेत," असे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सांगितलं. "राज्य सरकारनं यासाठी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातून जिल्हास्तरावर एकूण 2,707, विभागीय स्तरावर 740 आणि राज्यस्तरावर 240 अशा एकूण 3,740 खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली.

स्वप्निल कुसाळेचं होणार जंगी स्वागत : "पॅरिस ऑलिंपिक येथे कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राचं नाव उंचावणाऱ्या स्वप्नील कुसाळे याच्याबद्दल राज्याला अभिमान आहे. त्याच्या आणि अन्य खेळाडूंच्या तयारीसाठी सरकारनं 50 लाख रुपये आधीच दिले होते. आता कुसाळेला राज्य सरकारच्यावतीनं एक कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. जेव्हा तो महाराष्ट्रात परत येईल तेव्हा सरकारच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात येणार आहे, असं संजय बनसोडे यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. भारताला मोठा धक्का... अंतिम सामन्यात पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र, कारण काय? - Paris Olympics 2024
  2. ऑलिम्पिकमधून अपात्र झालेल्या विनेशसाठी पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट, म्हणाले... - PM Modi on Vinesh Phogat
  3. 'सर्वेश दादा, ऑल द बेस्ट',ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रार्थना.. - Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.