सेंच्युरियन SA vs IND 3rd T20I Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 13 नोव्हेंबर (बुधवार) रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं खेळवला जाईल. भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची T20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
📍 Centurion
— BCCI (@BCCI) November 12, 2024
Gearing up for the 3⃣rd T20I 💪 👌#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/4SUx9hDsCU
मालिकेत आतापर्यंत काय झालं : मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसननं 107 धावांची खेळी केली, ज्यामुळं भारतीय संघ 202/8 पर्यंत पोहोचला. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दक्षिण आफ्रिका 141 धावांत गडगडला आणि सामना 61 धावांनी गमावला. सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या T20 सामन्यात यजमान संघानं पुनरागमन करत भारतावर तीन विकेट्स राखून कमी धावसंख्येचा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला 125 धावांचा पाठलाग करताना त्याच्या नाबाद 47 धावांच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 29 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 16 सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 12 वेळा विजय मिळवला आहे. 1 सामना कोणत्याही निकालाशिवाय राहिला आहे. यात भारताचा काही प्रमाणात वरचष्मा दिसत आहे.
Gqeberha ✈️ Centurion
— BCCI (@BCCI) November 12, 2024
A journey ft. smiles and birthday celebrations 😃🎂#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/KnP1Bb1iA1
सेंच्युरियनची खेळपट्टी कशी असेल : सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ती वेगवान गोलंदाजांना मदत करते. येथील खेळपट्टीवर भरपूर उसळी आणि वेग आहे, ज्यामुळं वेगवान गोलंदाजांना त्यांच्या चेंडूंवर अधिक प्रभाव दाखवण्याची संधी मिळते. दक्षिण आफ्रिकेतील इतर खेळपट्ट्यांपेक्षा चेंडू बॅटवर वेगानं येतो आणि त्याची उसळी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असू शकते. हे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्गासारखे आहे आणि इथं अनेक सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार अनेकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.
T20 मध्ये सेंच्युरियनचा रेकॉर्ड कसा आहे? : सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्कमध्ये अनेक महत्त्वाचे सामने खेळले गेले आहेत. या स्टेडियमच्या T20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास, या ठिकाणी 14 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 7 सामने जिंकले आहेत आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानंही 7 सामने जिंकले आहेत. याशिवाय, या मैदानावरील मागील पाच सामन्यांतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 192 धावा आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 194 धावांची आहे. अशा परिस्थितीत या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 10, 2024
Superb Cricket from our Proteas!😃🥳🏏
🇿🇦South Africa win by 3 wickets
The series is now level at 1-1.
Next stop, Centurion😉#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/du7zjYW2KZ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 13 नोव्हेंबर (बुधवार) रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं भारतीय वेळेनुसार रात्री 08:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक रात्री 08:00 वाजता होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा T20 सामना कुठं आणि कसा दिसेल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतातील स्पोर्ट्स 18 चॅनेलवर उपलब्ध असेल. या रोमांचक सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर देखील पाहता येईल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.
हेही वाचा :