ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडच्या जबड्यातून हिसकावला विजयाचा 'घास'; हॅरी ब्रूकची झंझावाती खेळी व्यर्थ - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 7:03 AM IST

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. चालू विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा हा सलग सहावा विजय ठरलाय. क्विंटन डी कॉकनं 38 चेंडूत सर्वाधिक 65 धावा केल्या.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)

SA vs ENG T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024चा 45 वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय होता, त्यामुळं आफ्रिकेचं उपांत्य फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं. दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडसमोर 164 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. इंग्लंड संघाची धावसंख्या 11 व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा होती, त्यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या 78 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडला सामन्यात परत आणलं, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे बदलला. लिव्हिंगस्टोननं 17 चेंडूत 33 धावा केल्या, तर ब्रूकनं 37 चेंडूत 53 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी : प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 163 धावा केल्या. क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्स यांच्यात 86 धावांची सलामीची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिका 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असं वाटत होतं, पण मधल्या षटकात त्यांनी केवळ 52 धावा केल्या. क्विंटन डी कॉकनं 38 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 65 धावा केल्या. डेव्हिड मिलरनं 28 चेंडूत 43 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 163 पर्यंत नेण्यात मोठं योगदान दिलं.

आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर इंग्‍लंडचं लोटांगण : 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला, पण 8 चेंडूत केवळ 11 धावा करुन फिलिप सॉल्ट बाद झाला, तेव्हा चौकार-षटकारांचा पाऊस सुरू झाला नव्हता. केशव महाराजनं जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली तेव्हा स्कोअरबोर्डवर 50 धावाही नव्हत्या, त्यानं 20 चेंडूत 16 धावा केल्या. महाराजनं पुढच्याच षटकात कर्णधार जोस बटलरची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिल्यानं विकेट पडण्याचा सपाटा सुरू झाला. बटलरला 20 चेंडूत केवळ 17 धावा करता आल्या. मोईन अलीही काही खास कामगिरी दाखवू शकला नाही, तो बाद झाल्यामुळे इंग्लंडनं 61 धावात 4 विकेट गमावल्या.

लिव्हिंगस्टोन-ब्रूकची शानदार खेळी : 10 षटकानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडची धावसंख्या 14 षटकात 4 गडी बाद 87 धावा होती. ब्रूक आणि लिव्हिंगस्टोननं 15 व्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून पुढच्या 3 षटकात 52 धावा केल्या. त्यामुळं इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या 3 षटकात केवळ 25 धावा करायच्या होत्या.

कुठं आणि कसा पलटला सामना? : 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडानं लिव्हिंगस्टोनची विकेट घेतल्यावर सामन्याला कलाटणी मिळाली. लिव्हिंगस्टोननं 33 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या आशा हॅरी ब्रूकवर टिकून होत्या. रबाडाचं हे षटक इंग्लंडसाठी जीवघेणं ठरलं, कारण त्यात केवळ 4 धावा आल्या. मार्को जॅनसेननं 19 वं षटक टाकलं, त्यात त्यानं केवळ 7 धावा दिल्या. शेवटच्या षटकात इंग्लंडला14 धावा करायच्या होत्या. ॲनरिक नॉर्टजेनं शेवटचं षटक टाकलं. त्यानं पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकला बाद करुन इंग्लंडला बॅकफूटवर आणलं. सॅम करननं चौकार मारला, पण दुसऱ्या टोकाला त्याला साथ देणारं कोणी नव्हतं. 18व्या आणि 19व्या षटकात सामना आफ्रिकेच्या बाजूनं वळला. इंग्लंडला 6 बाद 156 धावा करता आल्या आणि आफ्रिकेनं 7 धावांनी सामना जिंकला.

हेही वाचा

  1. कोहलीच्या 'या विराट' विक्रमाची सूर्यानं त्याच्यापेक्षा निम्मे सामने खेळून केली बरोबरी - Player of The Match Awards
  2. पॅट कमिन्ससह 'या' सात गोलंदाजांनी केली टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक; कोणी कधी केला हा पराक्रम? - T20 World Cup Hat Tricks
  3. भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी अपात्र झालेल्या वेस्ट इंडिजनं 49 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास - ODI Cricket World Cup 1975
  4. बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम; ऑस्ट्रेलियानं 28 धावांनी जिंकला सामना, कमिन्सनं घेतली हॅट्ट्रिक ! - T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.