चेन्नई IND vs BAN Test Record : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक), चेन्नई इथं खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं महाकाय लक्ष्य होतं. परंतु, त्यांचा संपूर्ण संघ केवळ 234 धावांवरच मर्यादित राहिला. दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर इथं खेळवला जाणार आहे.
6⃣ wickets in the morning session on Day 4 🙌
— BCCI (@BCCI) September 22, 2024
Bangladesh 234 all out in the 2nd innings.
A dominating win for #TeamIndia! 💪
Scorecard ▶️ https://t.co/jV4wK7BOKA#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TR1RoEDyPB
रोहित शर्मानं कायम ठेवला ट्रेंड : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधला हा 179 वा विजय ठरला. भारताच्या 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, जिंकलेल्या सामन्यांची संख्या हरलेल्या सामन्यांपेक्षा जास्त आहे. तसंच भारतानं 580 सामन्यांपैकी 178 सामने गमावले आहेत. तर 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशविरुद्ध भारताचा धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2017 मध्ये भारतानं हैदराबाद कसोटी सामना 208 धावांनी जिंकला होता.
बांगलादेशविरुद्ध भारत अपराजित : तसं बघितलं तर, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा हा 12वा विजय आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी फक्त दोन सामने अनिर्णित राहिले (2007, 2015) आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये भारताचं वर्चस्व राहिलं. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये भारत बांगलादेशकडून अजून पराभूत झालेला नाही. हा ट्रेंड सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली सुरु झाला होता, आता सध्याचा कर्णधार रोहित शर्मानंही तो सुरु ठेवला आहे.
24 वर्षांपूर्वी झाला होता पहिला कसोटी सामना : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना सुमारे 24 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2000 मध्ये खेळला गेला होता. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता. त्या सामन्यात भारतीय संघानं 8 विकेट्सनं विजय मिळवला होता. त्यानंतर, गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2004 मध्ये बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केलं. त्यानंतर राहुल द्रविड (2007), महेंद्रसिंग धोनी (2010), विराट कोहली (2017, 2019) आणि केएल राहुल (2022) यांच्या नेतृत्वाखाली भारतानं बांगलादेशचा पराभव केला.
INDIA BEAT BANGLADESH BY 281 RUNS.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2024
- Ashwin, the hero with a century and a fifer. 🇮🇳 pic.twitter.com/YtZodqJfrM
आठपैकी सात मालिकांमध्ये भारताचा विजय : सध्याच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 8 मालिका झाल्या आहेत. या आठ मालिकांपैकी भारतानं सात मालिका जिंकल्या आहेत. दोन देशांमधील एकमेव मालिका 2015 मध्ये अनिर्णित राहिली होती, जी एका सामन्याची होती. त्या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. आता सुरु असलेल्या नवव्या मालिकेत भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे. एक गोष्ट नक्की की भारतीय संघ सध्याची कसोटी मालिका गमावू शकत नाही.
चेपॉकवर 16वा विजय : एकूणच, चेपॉकमधील भारतीय संघाचा हा 16वा कसोटी विजय ठरला. यापूर्वी भारतानं चेपॉकमध्ये 34 सामने खेळले होते, ज्यात 15 सामने जिंकले होते, तर 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 11 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत संपला. दुसरीकडे बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी आला होता, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
12 वर्षांपासून भारत अपराजित : घरच्या भूमीवर भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. 2012 पासून भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगला खेळत आहे. त्यानंतर भारतानं घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. म्हणजेच नोव्हेंबर 2012 पासून भारत घरच्या सलग 17 कसोटी मालिकेत अपराजित आहे. दुसरीकडे बांगलादेशी संघ पाकिस्तानला मालिकेत 2-0 नं पराभूत करुन भारतात आला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामने :
- एकूण सामने : 14
- भारतानं जिंकले : 12
- बांगलादेशनं जिंकले : 0
- ड्रॉ : 2
भारत आणि बांगलादेश यांच्यातील आतापर्यंतच्या मालिका :
- 2000 : बांगलादेश यजमान, भारत 1-0 नं जिंकला
- 2004 : बांगलादेश यजमान, भारत 2-0 नं जिंकला
- 2007 : बांगलादेश यजमान, भारत 1-0 नं जिंकला (2 सामन्यांची मालिका)
- 2010 : बांगलादेश यजमान, भारत 2-0 नं जिंकला
- 2015 : बांगलादेश यजमान, 0-0 (ड्रॉ)
- 2017 : भारत यजमान, भारत 1-0 नं जिंकला
- 2019 : भारत यजमान, भारत 2-0 नं जिंकला
- 2022 : बांगलादेश यजमान, भारत 2-0 नं जिंकला
- 2024 : भारत यजमान, भारत सध्या 1-0 नं आघाडीवर आहे
हेही वाचा :
- भारताच्या दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडला झटका, श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये नुकसान - WTC Point Table Update
- अफगाणिस्तान क्रिकेट म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव... स्वतःचं मैदान आणि सरकारचा पाठिंबा नसतानाही बलाढ्य संघाविरुद्ध मालिका जिंकत रचला इतिहास - AFG vs SA 3rd ODI
- कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारे दिग्गज फलंदाज; भारताच्या 'या' खेळाडूंचा समावेश - Batsman Out on Zero