मुंबई International Masters League : भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आता पुन्हा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. कारण इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) सुरु होत आहे. या लीगचा पहिला हंगाम 17 नोव्हेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.
नवी मुंबईत होणार 4 सामने : या लीगमधील पहिले 4 सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. यात 17 नोव्हेंबरला भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. यात 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा आमनेसामने असतील. तर दुसऱ्या सामन्यात शेन वॉटसनच्या ऑस्ट्रेलियाचा सामना जॅक कॅलिसच्या दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. यानंतर श्रीलंकेचा सामना इऑन मॉर्गनच्या इंग्लंडशी होणार आहे. ब्रायन लारा आणि त्याचा वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
लखनऊमध्ये होणार 6 सामने : यानंतर 21 नोव्हेंबरपासून लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर 6 सामने खेळवले जातील. लखनऊनंतर ही लीग रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल. सेमीफायनल आणि फायनलसह काही 8 सामने रायपूरमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना सामना 8 डिसेंबर रोजी होणार आहे. या लीगमध्ये 6 संघांमध्ये एकूण 18 सामने खेळवले जातील.
रोमांचक सामने होतील : क्रिकेट आयकॉन आणि या लीगचा ॲम्बेसेडर सचिन तेंडुलकर म्हणाला, "IML ॲम्बेसेडर म्हणून, मी लीगमध्ये इंडिया मास्टर्सचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे आणि सर्व खेळाडूंना IML खेळण्याची संधी मिळेल याबद्दल उत्साही आहे. आपल्या सर्वांना आवडणारा खेळ साजरा करताना पुढील पिढीला प्रेरणा देण्याची ही एक संधी आहे."
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमधील 6 संघांचे कर्णधार :
- भारत : सचिन तेंडुलकर
- वेस्ट इंडिज : ब्रायन लारा
- श्रीलंका : कुमार संगकारा
- ऑस्ट्रेलिया : शेन वॉटसन
- इंग्लंड : इऑन मॉर्गन
- दक्षिण आफ्रिका : जॅक कॅलिस
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचं वेळापत्रक :
- भारत विरुद्ध श्रीलंका : 17 नोव्हेंबर, मुंबई
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 18 नोव्हेंबर, मुंबई
- श्रीलंका विरुद्ध इंग्लंड : 19 नोव्हेंबर, मुंबई
- वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 20 नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 21 नोव्हेंबर, लखनऊ
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड : 23 नोव्हेंबर, लखनऊ
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 24 नोव्हेंबर, लखनऊ
- वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका : २५ नोव्हेंबर, लखनऊ
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 26 नोव्हेंबर, लखनऊ
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 27 नोव्हेंबर, लखनऊ
- भारत विरुद्ध इंग्लंड : 28 नोव्हेंबर, रायपूर
- श्रीलंका विरुद्ध इंग्लंड : 30 नोव्हेंबर, रायपूर
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : 1 डिसेंबर, रायपूर
- श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 2 डिसेंबर, रायपूर
- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड : 3 डिसेंबर, रायपूर
- पहिला उपांत्य सामना : 5 डिसेंबर, रायपूर
- दुसरी उपांत्य सामना : 6 डिसेंबर, रायपूर
- अंतिम सामना : 8 डिसेंबर, रायपूर
हेही वाचा :