Rohit Sharma Speech In Marathi : भारतीय संघानं 29 जून रोजी टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024चं विजेतेपद पटकावलं. या विजयाबरोबरच भारतानं आयसीसी ट्रॉफीची 11 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं हे विजेतेपद पटकावलं होतं. भारतात परतलेल्या भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील मुंबईचे खेळाडू यांचा विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कर्णधार रोहित शर्मानं चक्क मराठीतून भाषण करत तुफान फटकेबाजी केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. तसेच मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही स्पष्ट केले. pic.twitter.com/fTUTR8yFOn
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2024
रोहित शर्मासह 'या' खेळाडूंचा सत्कार करण्यात आला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी 5 जुलै रोजी मुंबईतील त्यांच्या घरी टी-20 विश्वचषक 2024 च्या भारताच्या संघात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंची भेट घेतली. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा भारताच्या टी-20 विश्वचषक विजयातील भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. त्यानंतर विधिमंडळात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
विधिमंडळात पहिल्यांदाच, विश्वविजेत्यांचा सन्मान..!
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2024
आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट २०२४ विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा तसेच त्याचे संघातील सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे… pic.twitter.com/iSBsRlYMAf
फार आनंद वाटला : यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "सगळ्यांना माझा मोठा नमस्कार. सीएम सर तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इकडं बोलवलं बरं वाटलं सगळ्यांना बघून.. सीएम साहेबांनी मला आताच सांगितलं की, असा कार्यक्रम इकडं कधी झाला नाहीय. आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवला, हे पाहून आम्हालाही फार आनंद वाटला. 11 वर्ष आम्ही थांबलेलो या विश्वचषकासाठी. 2013 मध्ये आम्ही शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो."
#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men's cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis
— ANI (@ANI) July 5, 2024
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV
सूर्याच्या हातात कॅच बसला बरं झालं, नाहीतर... : या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर घेतलेल्या कॅचबाबत मजेशीर प्रतिक्रिया दिली. "हे यश काही आमच्या चौघांचं नाही, सर्व टीम इंडियाचं आहे. सूर्याच्या हातात कॅच बसला हे बरं झालं, नाहीतर त्याला आम्ही बसवलं असतं.” रोहितच्या या प्रतिक्रियेनंतर सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकला. सूर्यानंही मनोगत व्यक्त करताना त्या कॅचबाबत "कॅच हातात बसला", असं म्हणाला. यावर बोलताना रोहितनं ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा
- नाशिकच्या सर्वेश कुशारेचा भीम पराक्रम; मक्याच्या भुशावरून थेट पॅरिस ऑलम्पिकमध्ये उडी - Paris Olympics 2024
- T20 विश्वविजेत्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचे बक्षीस, विधान भवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार - T20 world champion Indian team
- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खास सत्कार - felicitated by Chief Minister