ETV Bharat / sports

'वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात...' रोहितचं मराठीत भाषण ऐकलंत का? - Rohit Sharma Marathi Speech

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला आपण सामन्यानंतर नेहमी इंग्रजीत बोलताना बघतो. एका कार्यक्रमात त्यानं अस्सल मराठीत भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली.

Rohit Sharma Marathi Speech
रोहित शर्माचं मराठीत भाषण (Screenshot From Social Media (X))
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 3, 2024, 6:59 PM IST

Updated : Oct 4, 2024, 12:08 PM IST

कर्जत-जामखेड (अहमदनगर) Rohit Sharma Marathi Speech : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते कर्जत-जामखेड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडीयम व क्रीडा संकुलाचं भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी त्यानं अस्सल मराठीत भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली.

रोहित शर्माचं मराठीत भाषण (ETV Bharat Reporter)

मराठीतून केलं भाषण : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियाम आणि क्रीडा संकुलाचं भूमीपूजन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते संपन्न झाला. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यातील होतकरु आणि गुणी खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी क्रिकेट स्टेडीयम व क्रीडा संकुलाचं भूमीपूजन करण्यात आलं. या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं "कस काय कर्जत जामखेडकरांनो..." असं मराठीतून बोलत आपल्या भाषणाची सुरुवात केली, अन् उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

काय म्हणाला रोहित : यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यासपीठावर येताच उपस्थितांनी एकच जल्लोश केला. रोहित शर्मा यांनी व्यासपीठावरील प्रतिमांना अभिवादन करत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करत मराठीतून भाषणाला सुरुवात करत चाहत्यांना एक आगळा वेगळा धक्का दिला. "कस काय कर्जत जामखेडकरानो..." असं म्हणत रोहित शर्मानं उपास्थितांची मनं जिंकली. मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे रोहित शर्मानं आभार मानले. "माझं मराठी चांगलं नाही तरी मी प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप जिंकणं हे आमचं लक्ष्य होतं. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात जीव आलाय. पुढचे जैस्वाल, शुभमन गील, बुमराह हे नक्कीच येथील सुरु होणाऱ्या अकॅडमी मधील विद्यार्थी असतील अशी 100 टक्के मला खात्री वाटते," असं ही रोहित शर्मा म्हणाला. आमदार रोहित पवारांनी रोहित शर्माला कर्जतमध्ये आणून क्रिकेट स्टेडीयम आणि क्रीडा संकुलचं भूमीपूजन केलं. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा कितपत फायदा त्यांना होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराला ईडीचं समन्स, करोडोंच्या घोटाळ्याचा आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Former Cricketer summoned by ed
  2. रोहित शर्माला संघात घेण्यासाठी RCB खर्च करणार मोठी रक्कम? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य - Rohit Sharma in RCB

Last Updated : Oct 4, 2024, 12:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.