पुणे Rishabh Pant fir for Pune Test : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. पुण्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. बंगळुरु इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पंतला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ध्रुव जुरेलनं कीपिंगची जबाबदारी घेतली होती. अशा स्थितीत पंत पुणे कसोटीत खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
RISHABH PANT IS FIT TO PLAY THE PUNE TEST...!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2024
Pant has recovered & is fit and available for the 2nd Test against New Zealand. [Pratyush Raj From Express Sports] pic.twitter.com/47Wg9BRXeH
पंतला दुखापतीतून आराम : मात्र इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ऋषभ पंत बरा झाला आहे. त्याला गुडघेदुखीपासून आराम मिळाला आहे. बंगळुरु इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतला गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. यानंतर ध्रुव जुरेलनं त्याच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली. दुखापत झाल्यानंतर पंतनं हार मानली नाही तरीही तो फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानं 99 धावांची खेळीही खेळली. मात्र, फलंदाजी करताना पंतला धावा करण्यात अडचणी येत होत्या.
केएल राहुल की सरफराज दोघांपैकी कोण खेळणार : दुसरीकडे शुभमन गिल देखील दुखापतीमुळं पहिला कसोटी सामना खेळू शकला नसला तरी पुण्याच्या सामन्यात तो उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहितनं गिलला प्लेइंग-11 मध्ये निवडलं तर कोणाला वगळलं जाइल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. केएल राहुलच्या जागी गिलला संधी दिली जाऊ शकते याची शक्यता जास्त आहे. कारण केएल राहुलला बेंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात खातंही उघडता आलं नाही. तर दुसऱ्या डावात केवळ 12 धावा केल्या. दुसरीकडे सर्फराज खान आहे, जो पहिल्या डावात खातंही उघडू शकला नाही. पण पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं भारतीय संघाची धुरा सांभाळली. सर्फराजनं 150 धावांची दमदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं.
Rishabh Pant & Axar Patel is working hard in Gym ahead of the 2nd Test. 🇮🇳 pic.twitter.com/Q1E8VT0jD6
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2024
वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळणार? : BCCI नं फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश केला आहे. पण पुणे कसोटीत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवणं कठीण दिसत आहे. भारतीय संघ 3 फिरकीपटूंसोबत गेला तर कुलदीप यादव किंवा सुंदरला संधी मिळू शकते. खेळपट्टीनं वेगवान गोलंदाजांना मदत केली तर आकाश दीपला संधी दिली जाऊ शकते.
पुणे कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11 :
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर/आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
हेही वाचा :