बेंगळुरु Rishabh Pant Out on 99 : भारतीय क्रिकेट संघानं बंगळुरु इथं सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात 356 धावांनी पिछाडीवर असतानाही भारतीय संघानं सामन्यात न्यूझीलंडवर वर्चस्व राखलं आहे. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. सरफराज खानच्या दीडशतकानंतर ऋषभ पंतनंही अप्रतिम खेळी केली. मात्र तो शतकापासून फक्त 1 धाव दूर राहिला. 99 धावा केल्यानंतर त्यानं आपली विकेट गमावली. पण बाद होण्यापूर्वी त्यानं भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणलं.
Indian wicketkeepers to dismiss on 99 in Tests:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
MS Dhoni Vs England in 2012..
Rishabh Pant Vs New Zealand in 2024. pic.twitter.com/fr2Fqc3p1i
ऋषभ पंतचं शतक 1 धावेनं हुकलं : ऋषभ पंत एकेकाळी कठीण परिस्थितीत भारतीय संघाचा संकटमोचक बनला होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्यानं 105 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 9 चौकार आणि 5 षटकार मारले. ही सातवी वेळ होती जेव्हा पंत 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर शतक करु शकला नाही. याआधी ऋषभ पंत कसोटीत 97 धावा, 96 धावा, 93 धावा, 92 धावा, 92 धावा आणि 91 धावा करुन बाद झाला आहे.
THE MOST HEARTBREAKING PICTURE OF THE DAY. 🥹💔
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
Rishabh Pant batted so well, even after struggling due to knee issues, he entertained like he does every time. 7th score in the 90s for Pant in Tests. 💔 pic.twitter.com/ZNzGZDZFCa
भारतीय क्रिकेटमध्ये 12 वर्षांनंतर घडलं : ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा तो 99 धावा करुन बाद झाला. त्याचवेळी, भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर एखादा यष्टीरक्षक फलंदाज 99 धावा करुन बाद झाला आहे. याआधी 2012 मध्ये एमएस धोनी 99 धावांवर बाद झाला होता. धोनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 99 धावा करुन धावबाद झाला होता. आता 12 वर्षांनंतर पंतसोबत असं घडलं आहे. याशिवाय ऋषभ पंत कसोटीत 99 धावांवर बाद झालेला पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पंत आणि धोनीशिवाय मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांच्यासोबतही असं घडलं आहे.
हेही वाचा :