ETV Bharat / sports

काय सांगता! 147 चेंडूत 300 धावा; हैदराबादच्या तन्मयनं रचला इतिहास, ब्रायन लाराचा 'हा' विक्रमही धोक्यात - Ranji Trophy 2023

Tanmay Agarwal Record Innings : हैदराबादच्या तन्मय अग्रवालनं अवघ्या 147 चेंडूत धडाकेबाज त्रिशतक झळकावून इतिहास रचलाय. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक ठोकणारा खेळाडू ठरलाय.

Tanmay Agarwal Record Innings
Tanmay Agarwal Record Innings
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 7:13 AM IST

हैदराबाद Tanmay Agarwal Record Innings : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जातोय. इथून थोड्याच अंतरावर असलेल्या नेक्सजेन क्रिकेट मैदानावर रणजी करंडक फेरीच्या चौथ्या सामन्यादरम्यान एक नवीन विक्रम केला गेलाय. हैदराबाद आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर तन्मय अग्रवालनं अवघ्या 147 चेंडूत त्रिशतक झळकावून इतिहास रचलाय. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.

  • Magnificent! 🤯

    Hyderabad's Tanmay Agarwal has hit the fastest triple century in First-Class cricket, off 147 balls, against Arunachal Pradesh in the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy match 👌

    He's unbeaten on 323*(160), with 33 fours & 21 sixes in his marathon knock so far 🙌 pic.twitter.com/KhfohK6Oc8

    — BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान तिहेरी शतकाचा जागतिक विक्रम : तन्मयनं धडाकेबाज फलंदाजी करत 160 चेंडूत 33 चौकार आणि 21 षटकारांच्या मदतीनं नाबाद 323 धावा करत राहुल सिंगसोबत पहिल्या विकेटसाठी 449 धावांची भागीदारी केली. या सामन्यात त्यानं 147 चेंडूत त्रिशतक पूर्ण केलं, जे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद त्रिशतक आहे. 28 वर्षीय तन्मयनं 147 चेंडूत त्रिशतक झळकावत बॉर्डर आणि वेस्टर्न प्रोव्हिन्स यांच्यातील सामन्यात 191 चेंडूत त्रिशतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराईसचा विक्रम मोडीत काढलाय.

एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम : तन्मयनं आपल्या या खेळीमध्ये 21 गगनचुंबी षटकार ठोकले. यासह तो आता रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनलाय. त्यानं इशान किशनचा (14 षटकार) विक्रम मोडलाय.

प्रथम श्रेणीतील सर्वात जलद द्विशतक : तन्मय प्रथम श्रेणीतील द्विशतक झळकावणारा भारताकडून सर्वात वेगवान फलंदाज बनलाय. त्यानं 119 चेंडूंचा सामना करत आपलं द्विशतक पूर्ण केलं. हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजानं झळकावलेलं सर्वात जलद द्विशतक आहे. तन्मयनं 160 चेंडूत केलेल्या नाबाद 323 धावांच्या जोरावर हैदराबादनं 48 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 529 धावा केल्या आहेत.

लाराचा विक्रम मोडू शकतो का ? : तन्मय सध्या 323 धावा करुन नाबाद आहे. त्यामुळं तो वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक 501 धावांचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्यानं डरहमविरुद्ध इंग्लिश काऊंटी सामन्यात वारविकशायरकडून खेळताना ही खेळी केली होती. भारतीय क्रिकेटमधील हा विक्रम बीबी निंबाळकर यांच्या नावावर आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि काठियावाड यांच्यातील रणजी सामन्यात 443 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. राहुल, जडेजानं ठोकलं शानदार अर्धशतक, टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर
  2. 'यशस्वी' सुरुवातीनंतर भारताला दुसऱ्या दिवशी दोन धक्के; मात्र भारतीय संघ मजबूत स्थितीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.