मुंबई Prithvi Shaw Dropped : बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉला मोठा धक्का बसला आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला मुंबई संघातून वगळण्यात आलं आहे. 24 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याच्या वाढत्या वजनामुळं निवडकर्त्यांनी मुंबई संघात निवडलं नसल्याचं सांगितलं जात आहे.
Prithvi Shaw dropped from the Mumbai squad due to discipline and fitness issue. Sad. Nothing going well for him. pic.twitter.com/I69EY6jQLP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) October 22, 2024
शरीरातील चरबी वाढल्यामुळं बाहेर : सध्याच्या रणजी मोसमात मुंबईला 26 ऑक्टोबरपासून आगरतळा इथं त्रिपुराविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. खराब फिटनेसमुळं पृथ्वी शॉची संघात निवड झाली नसल्याचं वृत्त आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या प्रशिक्षकांनी दोन आठवड्यांसाठी तयार केलेल्या फिटनेस प्रोग्रामचं पालन करण्यास सांगितलं आहे. टीम मॅनेजमेंटनं एमसीएला दिलेल्या अहवालात पृथ्वी शॉच्या शरीरात 35 टक्के फॅट असल्याचं सांगितलं आहे आणि संघात परत येण्यापूर्वी त्याला कठोर प्रशिक्षणाची गरज आहे.
रहाणेचं कर्णधारपद कायम : पृथ्वी शॉनं आतापर्यंत चालू रणजी ट्रॉफी हंगामातील दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये अनुक्रमे 7,12, 1 आणि 39 धावा केल्या आहेत. एमसीएच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'त्याला वगळण्यात आलं आहे आणि पृथ्वीला पुन्हा संघात निवड होण्यापूर्वी सराव करणे आणि वजन कमी करणं आवश्यक आहे.' दरम्यान, त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबई संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरही सामना खेळणार आहेत तर सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळं या सामन्यातून बाहेर आहे.
Prithvi Shaw is dropped from the Mumbai Ranji Trophy squad.
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) October 22, 2024
He was inconsistent in attending practice sessions and is also overweight, asked to reduce the weight. pic.twitter.com/eFWcsZNTKC
वादांशी जुना संबंध : पृथ्वी शॉनं जुलैमध्ये बेंगळुरुमध्ये मुंबईच्या कंडिशनिंग कॅम्प आणि चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफीमध्येही भाग घेतला नाही. गेल्या वर्षी, मुंबईतील एका क्लबबाहेर एका व्यक्तीसोबत केलेल्या मारहाणीमुळं आणि भांडणामुळं तो वादात सापडला होता. गतविजेत्या मुंबईचे दोन सामन्यांतून सहा गुण झाले असून ते सध्या अ गटात चौथ्या स्थानावर आहेत. IPL लिलावापूर्वी फिटनेसशी संबंधित कारणांमुळं वगळलं जाणं हे पृथ्वीसाठी गंभीर धक्क्यापेक्षा कमी नाही.
मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आंगकृष्ण रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोर (यष्टीरक्षक), सिद्धांत अधाट्रोव (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, हिमांशू सिंह, शरहुल सिंह. ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.
हेही वाचा :