रावळपिंडी (पाकिस्तान) PAK vs BAN Test : पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघांमधील सामन्याचा आज चौथा दिवस आहे. सामन्याचे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर बांगलादेशचा संघ पाकिस्तानपेक्षा 122 धावांनी मागे आहे. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) तिकीट दर कमी ठेवल्यानंतरही चाहते सामना पाहण्यासाठी येत नसल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.
Spectators watch the #PAKvBAN Test on Friday afternoon 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2024
PCB has announced free entry for fans for the remainder of the match 🏟️
More details ➡️ https://t.co/nyhltmkFon#TestOnHai pic.twitter.com/yMKM38LSjc
पीसीबीनं जारी केलं प्रसिद्धीपत्रक : पीसीबीनं शेवटच्या 2 दिवसांत आपल्या सर्व प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश जाहीर केला आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यात प्रेक्षकांची संख्या वाढवता यावी यासाठी पीसीबीनं प्रेक्षकांची सततची कमतरता लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे. मात्र, बोर्डानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मोफत तिकिटांचं कारण वीकेंड असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तिकीटाची किंमत किती : पीसीबीनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, वीकेंडच्या निमित्तानं विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत तिकिटांची घोषणा केली आहे. जेणेकरुन ते क्रिकेट स्टारला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकतील. ज्यांनी मागील 2 दिवसांसाठी आधीच तिकिटं खरेदी केली आहेत, त्यांना आपोआप परतावा मिळेल. बांगलादेश विरुद्धचा सामना पाहण्यासाठी पाकिस्ताननं तिकीटाची किंमत 50 पाकिस्तानी रुपये ठेवली आहे, जी 15 भारतीय रुपयांइतकी आहे. एवढ्या कमी किंमती असूनही चाहते हा सामना पाहायला आले नाही.
पाकिस्तानात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढच्या वर्षीच पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल. त्यासाठी पाकिस्तानातील मैदानांच्या नूतनीकरणाचं काम जोरात सुरु आहे. पीसीबी त्यासाठी फ्लडलाइट भाड्यानं घेत आहे, त्याशिवाय वर्षभरासाठी जनरेटरही भाड्यानं घ्यावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी तेथील क्रिकेट मैदानाचा पर्दाफाश केला होता, ज्यात त्यांनी तेथील स्टेडियम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नसल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा :