पॅरिस Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट (शनिवार) रोजी भारतीय खेळाडू आपला खेळ दाखवत आहेत. महिला नेमबाज रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) मध्ये कांस्यपदक जिंकलं. रुबिना फ्रान्सिसनं अंतिम सामन्यात 211.1 गुण मिळवले. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकं जिंकली आहेत.
Indian shooter Rubina Francis wins Bronze medal in the Women's 10m Air Pistol SH1 Event at the Paralympics in Paris pic.twitter.com/hs3qt9aonL
— ANI (@ANI) August 31, 2024
इराणच्या खेळाडूनं जिंकलं सुवर्ण : या स्पर्धेत इराणच्या जावानमर्दी सारेहनं सुवर्ण तर तुर्कीच्या ओझगान आयसेलनं रौप्यपदक पटकावलं. जावनमर्दी सारेहनं 236.8 गुण मिळवले. तर ओझगन आयसेलनं 231.1 गुण मिळवले. रुबिना एकेकाळी दुसऱ्या क्रमांकावर होती, पण नंतर ती मागे पडली. नेमबाजीमध्ये, SH1 श्रेणीमध्ये अशा नेमबाजांचा समावेश होतो ज्यांनी त्यांच्या हातांच्या हालचालींवर, खालच्या धडावर, पायांवर परिणाम केला आहे.
कोण आहे रुबिना फ्रान्सिस? : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील पॅरा पिस्तुल नेमबाज रुबिना हिनं जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स विश्वचषक 2023 मध्ये 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक जिंकलं होतं. रुबिनानं 2017 मध्ये बँकॉक इथं झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ज्युनियर विश्वविक्रम केला होता. क्रोएशियामध्ये 2019 च्या जागतिक पॅरा चॅम्पियनशिपमध्येही त्यानं कांस्यपदक जिंकलं होतं. 25 वर्षीय रुबिनाला रिकेट्स आहे आणि तिच्या पायात 40 टक्के दिव्यांद आहे. रिकेट्स एक अशी स्थिती आहे जी मुलांच्या हाडांच्या विकासावर परिणाम करते. या आजारामुळं हाडांमध्ये वेदना आणि कमकुवतपणा येतो. रुबीना मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीत पिस्तुल नेमबाजीचे प्रशिक्षण घेते.
अवनीनं नेमबाजीत पटकावलं होतं सुवर्णपदक : पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतानं चार पदकं जिंकली होती. मनीष नरवालनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) मध्ये रौप्यपदक जिंकलं. तर प्रीती पाल हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत (T35) कांस्यपदक जिंकलं होतं. तर महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) नेमबाजीत अवनी लेखरा हिनं सुवर्णपदक आणि मोना अग्रवालनं कांस्यपदक जिंकलं.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते :
- अवनी लेखरा (नेमबाजी) : सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) : रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
हेही वाचा :