ETV Bharat / sports

कुस्तीपटू रितिका हुड्डाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची मोहीम संपल्यात जमा - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : भारताची युवा कुस्तीपटू रितिका हुड्डाला महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो वजनी कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं अभियान संपुष्टात आल्यात जमा आहे.

wrestler reetika hooda
रितिका हुड्डा (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 10, 2024, 4:56 PM IST

Updated : Aug 10, 2024, 5:12 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : भारताची युवा कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो वजनी कुस्तीच्या (Women's 76 KG Wrestling Olympics) उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं अभियान जवळपास संपुष्टात आलं आहे. 21 वर्षीय रितिका हुड्डाचा उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या अव्वल मानांकित अपारी मेडेट काईजीकडून (Aiperi Medet Kyzy) पराभव झाला.

रितिका हुड्डाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव : भारताची युवा कुस्तीपटू 21 वर्षीय रितिका हुड्डाचा (Reetika Hooda Olympics) उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या अव्वल मानांकित अपारी मेडेट काईजीनं पराभव केला. दोघांमधील सामना 6 मिनिटांनंतर 1-1 असा बरोबरीत सुटला. पण सामन्यातील शेवटचा पॉइंट किरगिझस्तानच्या अपारी मेडेट कैझीने केला. या कारणास्तव तिला या लढतीचा विजेता घोषित करण्यात आलं. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रितिकानं शानदार खेळ केला आणि किर्गिस्तानच्या विश्वविजेत्या कुस्तीपटूला फारशी संधी दिली नाही. रितिकानं संपूर्ण सामन्यात आपली ताकद दाखवली पण दुर्दैवानं तिला पराभवाला सामोरं जावं लागलं.

कांस्यपदकाच्या आशा कायम : 76 किलो वजनी कुस्तीमध्ये रितिका अजूनही रिपेचेजद्वारे कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. जर काईजी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली तर रितिका कांस्यपदकाची लढत खेळेल. (Repechage in Wrestling)

उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या बर्नाडेटचा केला पराभव : तत्पूर्वी, उप-उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूचा सामना 2024 युरोपियन चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या बर्नाडेट नागीशी झाला. रितिकानं हंगेरीच्या आठव्या मानांकित बर्नाडेट नागीचा 12-2 (तांत्रिक श्रेष्ठता) पराभव करुन महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल (Freestyle 76kg 2024 Olympics) कुस्तीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय युवा खेळाडू रितिकानं गेल्या वर्षी वर्ल्ड अंडर-23 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळं तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती.

हेही वाचा :

  1. विनेश फोगटच्या अपिलावर सुनावणी पूर्ण, रौप्यपदकाची आशा कायम; कधी येणार मोठा निर्णय? - Vinesh Phogat Plea Result
  2. पाकिस्तानचं एक पदक भारताच्या सहा पदकांवर पडलं भारी; 40 वर्षांनंतर भारतावर आली 'ही' नामुष्की - PARIS OLYMPIC 2024
  3. विनेश फोगटप्रमाणेच अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन, 10 तासांत 4.6 किलो वजन कमी करत रचला इतिहास; कसा घडला 'चमत्कार'? - Paris Olympics 2024

Last Updated : Aug 10, 2024, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.