नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. यानंतर आजपासून म्हणजेच 27 जुलैपासून सर्व देशांतील खेळाडू विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवताना दिसणार आहेत. आज भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी आणि टेनिससारख्या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत पदक मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
Checkout First Group Stage Fixtures of Our Shuttlers at #Paris2024 🔥🏸
— BAI Media (@BAI_Media) July 25, 2024
📸: @badmintonphoto#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/n8qVQ7FxpO
27 जुलै रोजी कोणत्या भारतीय खेळाडूंचे होणार सामने :
नेमबाजी : नेमबाजीमध्ये भारतासाठी आज एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. यात 10 मीटर एअर रायफल सांघिक पात्रता, 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता, 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता या स्पर्धा होणार आहेत. भारतासाठी 10 मीटर एअर रायफल संघात संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलावेनिल वालारिवन, रमिता जिंदाल हे दिसणार आहेत. तर सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा 10 मीटर एअर पिस्तूल पुरुषांच्या सामन्यात दिसणार आहेत. यासोबतच रिदम सांगवान, मनू भाकर यांचे 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता स्पर्धेत आपला खेळ असेल.
- 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता (संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलावेनिल वालारिवन, रमिता जिंदाल) - दुपारी 12:30 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता (सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा) - दुपारी 2 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता (रिदम सांगवान, मनू भाकर) - दुपारी 4 वाजता
बॅडमिंटन : बॅडमिंटनमध्ये आज भारताचे तीन सामने होणार असून यात पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना ग्वाटेमालाच्या कॉर्डन केविनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना फ्रान्सच्या कॉर्व्ही लुकास आणि लेबर रोनन यांच्याशी होईल. तर महिला दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी किम सो योंग आणि कांग ही योंग या कोरियन जोडीसोबत खेळताना दिसणार आहे. लक्ष्य सेन तसंच सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून भारताला गट टप्प्यातील सामन्यांमध्ये मोठ्या अपेक्षा असतील.
Mark your calendars!
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2024
Here's when and where you can catch Team India in action at the Paris Olympics 2024. 🏑🔥
Watch it all go down live on @JioCinema and @Sports18 #HockeyIndia #IndiaKaGame #HockeyLayegaGold #Paris2024 #Hockey #IndiaAtParis #Cheer4Bharat #WinItForSreejesh
.… pic.twitter.com/kcCuPdT9tF
- पुरुष एकेरी गट स्टेज (लक्ष्य सेन) - दुपारी 12 वाजता
- पुरुष दुहेरी गट स्टेज (सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी) - दुपारी 12 वाजता
- महिला दुहेरी गट (तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा) - दुपारी 12 वाजता
बॉक्सिंग : बॉक्सिंगमध्ये आज भारताचा एकच सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारताची महिला बॉक्सर प्रीती पवार महिलांच्या 54 किलो वजनी स्पर्धेत राउंड ऑफ 32 सामना खेळताना दिसणार आहे. तिचा सामना व्हिएतनामच्या विओ थी किम आन्ह हिच्याशी होईल.
- महिला 54 किलो (प्रीती पवार), 32 ची फेरी - संध्याकाळी 7 नंतर
हॉकी : आज भारतीय हॉकी संघ हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध ग्रुप स्टेजचा पहिला सामना खेळताना दिसणार आहे.
- गट ब : भारत विरुद्ध न्यूझीलंड (पुरुष) - रात्री 9 वाजता
टेनिस : आज टेनिसमध्ये, भारताचा सर्वात अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार एन श्रीराम बालीजी पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत रेबोल फॅबियन आणि रॉजर-व्हॅसेलिन एडुआर्ड या फ्रेंच जोडीविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
- पुरुष दुहेरी (रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी) - दुपारी 03:30 वाजता
टेबल टेनिस : आज भारतासाठी टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाई पहिल्या फेरीतील पहिला सामना जॉर्डनच्या अबो यामन जैदसोबत खेळताना दिसणार आहे. 27 जुलै रोजी भारत टेबल टेनिसमध्ये फक्त 1 सामना खेळणार आहे.
- पुरुष एकेरी (हरमीत देसाई) प्राथमिक फेरी - संध्याकाळी 6:30 नंतर
हेही वाचा :