पॅरिस Paris Olynmpics 2024 Shooting : भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी त्यानं पात्रता स्पर्धेत सातवं स्थान मिळवत टॉप 8 मध्ये स्थान मिळवलं आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. याशिवाय, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात स्टैंडिंग पोजीशन चुकली आणि परिणामी तो 11व्या स्थानावर राहिला. यात पहिल्या आठमध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्वप्नीलचा अंतिम सामना गुरुवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता होईल. राज्यासह देशाला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.
50 m Rifle 3P Men's Qualification
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
Swapnil Kusale finishes 7th with a total score of 590 and qualifies for the final.
Aishwary Pratap Singh Tomar finishes 11th with a total score of 589.
Top 8 from this round qualify for the final.
As more Indian players will play their… pic.twitter.com/rWD8k0Wvcc
कसं मिळवलं अंतिम फेरीत स्थान : स्वप्नीलनं गुणांच्या बाबतीत सातत्य दाखवत प्रत्येक सिरीजमध्ये 99 गुण मिळवले. त्यानं 13 वेळा आतील 10 रिंग्ज (X- इनर 10 रिंग) मारल्या. नीलिंग स्टेजनंतर स्वप्नील सहाव्या स्थानावर होता. तोच नीलिंग स्टेजनंतर ऐश्वर्यनं पहिल्या सिरीजमध्ये 98 गुण आणि दुसऱ्या सिरीजमध्ये 13Xसह 99 गुण मिळवत नववं स्थान पटकावलं. प्रोन पोझिशन फेरीनंतर, हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता ऐश्वर्यनं सहावं स्थान पटकावलं होतं, तर स्वप्नील दहाव्या स्थानावर घसरला होता. ऐश्वर्यनं प्रोन पोझिशनमध्ये त्याची लय कायम ठेवली आणि पहिल्या सिरीजमध्ये अचूक 10 निशाणे मारले. त्यानं या टप्प्यावर 199 गुण मिळवले, ज्यामध्ये 12 आतील 10-रिंग निशाण्यांचा समावेश होता. ज्यामुळं तो पहिल्या आठमध्ये पोहोचला. स्वप्नीलनं 13 आतील 10 रिंग निशाण्यांसह 197 गुण मिळवले.
ऐश्वर्यची संधी थोडक्यात हुकली : जागतिक क्रमवारीत 22व्या क्रमांकावर असलेल्या ऐश्वर्यला ही लय कायम राखता आली नाही. परिणामी तो अंतिम क्रमवारीत ती घसरला. ऐश्वर्यनं पहिल्या मालिकेत चार नऊ-गुण मिळवले आणि दुसऱ्या सीरिजमध्ये स्टँडिंग पोझिशन सेटच्या दुसऱ्या सीरिजमध्ये 99 पॉइंट मिळवूनही तो केवळ 193 गुणांपर्यंत पोहोचू शकला. मात्र, त्यानं दुसऱ्या सिरीजमध्ये 98 गुण मिळवून काहीस पुनरागमन केलं. तथापि, पात्रता स्पर्धेच्या पहिल्या आठमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला हे पुरेसं नव्हतं आणि परिणामी, तो या स्पर्धेतून बाहेर पडला.
हेही वाचा :