पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस आलिम्पिक 2024 मध्ये आज सहाव्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळालंय. कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली. या आलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलंय. यापुर्वी मनु भाकरनं एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गजांनी स्वप्निलचं अभिनंदन केलंय.
Exceptional performance by Swapnil Kusale! Congrats to him for winning the Bronze medal in the Men's 50m Rifle 3 Positions at the #ParisOlympics2024.
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2024
His performance is special because he’s shown great resilience and skills. He is also the first Indian athlete to win a medal in… pic.twitter.com/9zvCQBr29y
पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहत मिळवलं अंतिम फेरीत स्थान : स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं. अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. यात प्रत्येक नेमबाजाला 40 शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक 1-1 खेळाडू बाहेर होत गेला.
BRONZE MEDAL for Swapnil Kusale 🔥🔥🔥
— India_AllSports (@India_AllSports) August 1, 2024
Swapnil Kusale wins Bronze medal in 50m Rifle 3P (Shooting). #PARIS2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/FuDpD44Rlj
खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा राज्यातील पहिला खेळाडू : नीलिंगची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानावर होता. नंतर स्टँडिंग शॉट्स पदकांचं चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्नीलनं चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या फेरीच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्नील तिसऱ्या स्थानावर राहिला. तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्वप्नील पदक आणणार हे जवळपास निश्चित झालं. अखेर स्वप्नीलनं ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलं. खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला.
स्वप्निलची अंतिम फेरीतील कामगिरी :
- नीलिंग (पहली सीरीज)- 9.6, 10.4, 10.3, 10.5, 10.0, एकूण : 50.8 गुण
- नीलिंग (दूसरी सीरीज)- 10.1, 9.9, 10.3, 10.5, 10.1, एकूण : 51.9 गुण
- नीलिंग (तीसरी सीरीज)- 9.7, 10.3, 10.8, 10.4, 10.0, एकूण : 51.6 गुण
- प्रोन (पहली सीरीज)- 10.5, 10.6, 10.5, 10.6, 10.5, एकूण : 52.7 गुण
- प्रोन (दूसरी सीरीज)- 10.8, 10.2, 10.5, 10.4, 10.3, एकूण : 52.2 गुण
- प्रोन (तीसरी सीरीज)- 10.5, 10.4, 10.4, 10.2, 10.4, एकूण : 51.9 गुण
- स्टैंडिंग (पहली सीरीज)- 9.5, 10.7, 10.3, 10.6, 10.0, एकूण : 51.1 गुण
- स्टैंडिंग (दूसरी सीरीज)- 10.6, 10.3, 9.1, 10.1, 10.3, एकूण : 50.4 गुण
उर्वरित चार शॉट्स : 10.5, 9.4, 9.9, 10.0
हेही वाचा :