पॅरिस Neeraj Chopra Won Silver Medal in Olympic 2024 : नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्यपदक मिळवलं. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्यपदक आहे. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले. नंतर त्यानं दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मीचा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही.
Neeraj Chopra is excellence personified! Time and again he’s shown his brilliance. India is elated that he comes back with yet another Olympic success. Congratulations to him on winning the Silver. He will continue to motivate countless upcoming athletes to pursue their dreams… pic.twitter.com/XIjfeDDSeb
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2024
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं जिंकलं सुवर्णपदक : पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अर्शद नदीम याने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर भालाफेक केला. त्यानं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये नवीन विक्रम केला. या थ्रोसह त्याने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक मिळवलं.
नीरजची सुरुवात झाली खराब : नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिक 2020 चा सुवर्णपदक विजेता आहे. त्यामुळं त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची सर्व भारतीयांना आशा होती पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या सामन्यात त्याची चांगली सुरुवात झाली नाही. त्यानं पहिल्याच प्रयत्नात फाऊल थ्रो केला. त्यामुळं तो सुरुवातीलाच दडपणाखाली दिसला. अशातच त्याने 6 थ्रोमध्ये 5 फाऊल फेकले.
SILVER MEDAL 🥈
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2024
A seasons best, and a second Olympic Medal for @Neeraj_chopra1 . What an athlete 👏🏽👏🏽#JeetKiAur | #Cheer4Bharat pic.twitter.com/lUHMFaPfUK
दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो : नीरज चोप्रानं पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटरचा थ्रो केला. ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या दुसऱ्या थ्रोमुळं चोप्रानं स्पर्धेत दुसरे स्थान पटकावलं आणि रौप्यपदकावर कब्जा केला.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा नवा रेकॉर्ड : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भालाफेक या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा अर्शद नदीमनं नवा विक्रम रचला. अर्शदनं या अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात तब्बल ९२.९७ मी. लांब भाला फेकत नवा ऑलिम्पिक विक्रम केला. याआधी ९० मी. लांब भाला फेकण्याचा विक्रम होता. पण अर्शदने हा विक्रम मोडला.
हेही वाचा -
- "गोल्ड मेडल मिळवण्यासाठी...", स्वप्निल कुसाळे नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर - Olympic Medalist Swapnil Kusale
- भारतीय हॉकी संघानं पॅरिसमध्ये 52 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती; स्पेनचा पराभव करत देशाला मिळवून दिलं चौथं पदक - paris olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी अपात्र घोषित झाल्यानंतर विनेश फोगटला मिळाली स्टार्सची साथ - Vinesh Phogat