पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम केवळ 6 पदकांसह संपली. भारतीय संघ दोन अंकी पदक जिंकण्याच्या उद्देशानं पॅरिसला गेला होता. पण 6 खेळाडू चौथ्या क्रमांकावर राहिल्यानं आणि नंतर विनेश फोगटची अपात्रता यामुळं भारताची निराशा झाली. पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत अमेरिकेला मागं टाकत चीन अव्वल स्थानावर आहे.
चीननं अमेरिकेला टाकलं मागे : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पदकतालिकेत चीननं अमेरिकेला मागं टाकलं आणि रविवारी खेळांच्या अंतिम दिवशी 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावलं.
🇮🇳🙌 𝗕𝗿𝗶𝗻𝗴𝗶𝗻𝗴 𝗽𝗿𝗶𝗱𝗲 𝘁𝗼 𝗼𝘂𝗿 𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻! Aman Sehrawat wins India's sixth medal at #Paris2024 with a fantastic win over Darian Toi Cruz.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 9, 2024
🥉 Here's a look at all of India's medallists at the Paris Olympics so far.@Media_SAI @WeAreTeamIndia@Paris2024
👉… pic.twitter.com/LRbd4JPAVF
अमेरिका दुसऱ्या स्थानावर : अमेरिकेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 38 सुवर्ण, 42 रौप्य आणि 42 रौप्यपदकांसह एकूण 122 पदकं जिंकली. अमेरिकेच्या एकूण पदकांची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. मात्र 1 सुवर्णपदकानं पिछाडीवर असल्यामुळं पदकतालिकेत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि जपानचंही वर्चस्व : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियानं एकूण 50 पदकं जिंकली आहेत. कांगारुंनी 18 सुवर्ण, 18 रौप्य आणि 14 कांस्यपदक पटकावले असून ते पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी जपान 18 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्यांसह एकूण 43 पदकांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
🏅 Medal tally after day 1️⃣5️⃣ of the 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ Paris Olympics⏬️
— Khel Now (@KhelNow) August 11, 2024
The United States 🇺🇸 has the most medals but China 🇨🇳 has more 🥇 medals.#Paris2024 #Paris #OlympicGames #Olympic2024 #OlympicGamesParis2024 pic.twitter.com/Y7uZbvsgft
फ्रान्सचाही टॉप 5 मध्ये समावेश : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे यजमान फ्रान्स 16 सुवर्ण, 24 रौप्य आणि 22 कांस्यपदकांसह 62 पदकांसह पदकतालिकेत टॉप-5 मध्ये आले आहेत. त्याच वेळी, 14 सुवर्ण, 22 रौप्य आणि 27 कांस्यांसह एकूण 63 पदकं जिंकल्यानंतर, ब्रिटन सहाव्या स्थानावर घसरला आहे आणि टॉप-5 मधून बाहेर पडला आहे.
भारत 71 व्या स्थानावर : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची कामगिरी चांगली नव्हती. 1 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 6 पदकांसह भारतानं पदकतालिकेत 71 व्या क्रमांकावर आपली मोहीम पूर्ण केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 206 देश सहभागी झाले होते. यापैकी एकूण 91 देशांनी काही ना काही पदकं जिंकली. या 91 देशांनी मेडल टेलीमध्ये 82 स्थान मिळवले. ज्यात भारत 71 व्या स्थानावर आहे. यावरुन भारताच्या खराब कामगिरीचा अंदाज लावता येतो. 1 सुवर्णपदकासह पाकिस्तान भारतापेक्षा वरच्या म्हमजेच 62 व्या स्थानावर आहे.
क्रमांक | देश | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण |
1 | चीन | 39 | 27 | 24 | 90 |
2 | अमेरिका | 38 | 42 | 42 | 122 |
3 | ऑस्ट्रेलिया | 18 | 18 | 14 | 50 |
4 | जापान | 18 | 12 | 13 | 43 |
5 | फ्रांस | 16 | 24 | 22 | 62 |
71 | भारत | 0 | 1 | 5 | 6 |
हेही वाचा :