पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) भारतीय खेळाडू विविध खेळात आपली छाप पाडत आहेत. आता बॅडमिंटन आणि रोइंगनंतर आता नेमबाजीत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अव्वल नेमबाज रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. रमितानं पहिल्या सिरीजमध्ये 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्यात 105.7 गुण मिळवले. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (29 जुलै) होणार आहे.
10 M AIR RIFLE WOMEN’S QUALIFICATION ROUND Results👇🏻
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2024
Ramita Jindal shoots her way into the final with a score of 631.5, finishing 5th
Elavenil Valarivan finishes 10th with a score of 630.7
The top 8 progressed to the finals.
Let’s #Cheer4Bharat🥳 pic.twitter.com/OsNEGpdbBF
इलाव्हेलिन वालारिवनची निराशाजनक कामगिरी : रमितासह एलावेलिन वालारिवान हिनं देखील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु तिनं निराश केलं. वालारिवन 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर राहिली. वलारिवनची एका क्षणी अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु होती. मात्र शेवटच्या काही शॉट्समध्ये तिला आपला वेग कायम राखता आला नाही. यात टॉप 8 नेमबाजांनी पात्रता फेरीत स्थान मिळवलं आहे.
कोण आहे रमिता जिंदाल : हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे कर सल्लागार आहेत. 2016 मध्ये रमिताला तिच्या वडिलांच्या जागी करण शूटिंग रेंजमध्ये नेण्यात आलं. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. 20 वर्षीय रमितानं 2022 मध्ये ज्युनियर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर रमितानं हॉंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदकं जिंकली होती.
हेही वाचा :
- बलराज पनवारनं रचजला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024
- पीव्ही सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी; महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या रझाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या महिला फुटबॉल संघाला मोठा धक्का; सहा गुणांची कपात, तीन प्रशिक्षकांवरही बंदी, काय आहे कारण? - Paris Olympics 2024