Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं पुन्हा एकदा भारताचा तिरंगा फडकवला आहे. ग्रुप स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं आयर्लंड संघाचा 2-0ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सामन्यात 2 गोल केले.
FT:
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2024
A good win today against Ireland.
2 smashing goals from Harmanpreet Singh one via a Stroke and one from Penalty Corner.
A nearly perfect game from Team India with no goals conceded in the game.
Strong performance from the defence and the wall Sreejesh.
This win… pic.twitter.com/KEh0akUzCI
हरमनप्रीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू : भारताचा पहिला गोल 11व्या मिनिटाला हरमनप्रीतनं पेनल्टी स्ट्रोकद्वारे केला. त्यानंतर फक्त आठ मिनिटांतच भारताला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष हे हरमनप्रीतवर होते. कारण भारताकडून तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. हरमनप्रीत सिंगनं यावेळी पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिलं आणि 19व्या मिनिटाला भारतानx दुसरा गोल केला. हरमनप्रीत या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रीत खेळाडू ठरला आहे. त्यानं ऑलिम्पिकमध्ये 4 गोल केले आहेत. यानंतर आयर्लंडचा संघ आक्रमक दिसत होता. पण यावेळी भारतानं चांगला बचाव केला त्यामुळं भारताला 2-0 अशी आघाडी टिकवता आली.
1️⃣3️⃣ 1️⃣3️⃣ 1️⃣3️⃣ Suroooor
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2024
Harmanpreet stands at the top of the goal-scoring table with 4 goals at the Paris Olympics
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola_Ind#HockeyIndia #IndiaKaGame #Hockey #Paris24 #HockeyLayegaGold #IndiaAtParis… pic.twitter.com/29JYZpOHNN
भारताचा दुसरा विजय : भारतीय हॉकी संघाला सामन्यात नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र एकाच पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेता आला. तर आयर्लंड संघाला एकाही पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेता आला नाही. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय आहे. भारतानं पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी साधली होती. आजच्या विजयामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठणे अधिक सोपे होईल, कारण प्रत्येक पूलमधील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम हे भारताच्या गटात आहेत. या दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध भारतीय संघाला खेळायचं आहे. आता 1 ऑगस्टला बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा सामना होणार आहे.
हेही वाचा
- आईनं दागिने गहाण ठेवून मुलीला दिलं पाठबळ; "तिनं" कुस्तीतं सुवर्णपदकाला घातली गवसणी - World Wrestling Championship
- "भारत खूप आनंदी आहे...", नेमबाजीत कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू-सरबज्योतचं दिग्गजांकडून कौतुक - Paris Olympics 2024
- नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनं रचला इतिहास; भारताला जिंकवून दिलं दुसरं पदक - Paris Olympics 2024
- मनिका बत्राचं लक्षणीय यश; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला - Paris Olympics 2024