ETV Bharat / sports

भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का; उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी स्टार खेळाडूवर बंदी - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Hockey : उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का बसला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 'रेड कार्ड' मिळालेल्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

Paris Olympics 2024 Hockey
भारतीय हॉकी संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 5, 2024, 1:53 PM IST

Updated : Aug 5, 2024, 2:45 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रविवारी ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं चमकदार कामगिरी करत शूटआऊटमध्ये सामना जिंकला. मात्र आता भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.

अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी : पॅरिस ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून, आता तो मंगळवारी जर्मनीविरुद्ध भारताच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. रविवारी ग्रेट ब्रिटनविरुद्ध भारतीय हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमित रोहिदासला 'रेड कार्ड' मिळाल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हणाले अधिकारी : ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या निवेदनात म्हटलं की, 'एफआयएचनं 4 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन सामन्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित केलं आहे. निलंबनाचा सामना क्रमांक 35 (भारताचा जर्मनी विरुद्धचा उपांत्य सामना) प्रभावित होतो, ज्यात अमित रोहिदास सहभागी होणार नाही आणि भारत फक्त 15 खेळाडूंच्या संघासह खेळेल.'

का मिळालं 'रेड कार्ड' : ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासनं विल कॅलननविरुद्ध मिडफिल्डच्या लढाईत भाग घेतला होता. ग्रेट ब्रिटनच्या फॉरवर्डला टाळण्याचा प्रयत्न करत असताना, रोहिदासची हॉकी स्टिक कॅलननच्या चेहऱ्यावर लागली, परिणामी त्याला 'रेड कार्ड' मिळालं. मैदानावरील रेफरीनं हा गंभीर गुन्हा मानला नसला तरी व्हिडिओ रेफरलनंतर हा निर्णय बदलून 'रेड कार्ड' देण्यात आला.

जर्मनीसोबत उपांत्य फेरीत सामना : भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं एक गोल केला. परंतु ली मॉर्टनच्या गोलनं त्याचा गोल रद्द केला. भारतीय हॉकी संघाच्या बचावामुळं उपांत्यपूर्व फेरीचा सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला, त्यानंतर त्यांनी शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवले आणि भारताला उपांत्य फेरीत नेलं. गेल्या वर्षीही हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता जिथं त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागलं होतं. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जर्मनीशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. ऐकावं ते नवलच...! एकाच खेळाडूनं पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत जिंकलं पदक; ऑलिम्पिकच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं - Paris Olympics 2024
  2. पॅरिस ऑलिम्पिकचा दहावा दिवस : 'लक्ष्य सेन'च्या खेळाकडं चाहत्यांचं 'लक्ष'; पदक मिळवत रचणार इतिहास? - Paris Olympics 2024

Last Updated : Aug 5, 2024, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.