नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडूसह भारतानं भाग घेतल्यानं भारतीय खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करतील अशी क्रीडा चाहत्यांना आशा आहे. यातील काही खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत, तर काही जगभरातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहेत. भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या एकमेव सुवर्ण पदकासह 7 पदकं जिंकली होती. यावेळी पदकांची संख्या दुप्पट करण्याची इच्छा खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करेल.
ऑलिम्पिकमध्ये कसा आहे भारतीय संघ : पॅरिसमध्ये भारताकडून पदाकचे प्रबळ दावेदार असणारे नीरज चोप्रा तसंच रँकीरेड्डी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी ही बॅडमिंटन जोडी असेल. भारताच्या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू तीन खेळांचे आहेत. ॲथलेटिक्स (29), नेमबाजी (21) आणि हॉकी (19) या तीन खेळांच्या खेळाडूंचा जास्त समावेश आहे. तर विशेष म्हणजे 69 खेळाडूंपैकी 40 नवीन खेळाडू आहेत. भारतीय संघातील अनुभवी खेळाडू दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू, अनुभवी टेनिस स्टार रोहन बोपण्णा, टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश यांच्याकडून खेळात सुधारणा अपेक्षित आहे.
कोणत्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा : भारताला पदकाची सर्वात जास्त अपेक्षा भालाफेकपटू नीरज चोप्रावर असणार आहे. त्यानं गेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. तो केवळ पोडियमच्या शिखरावरच न पोहोचता त्याच्या थ्रोनं 90 मीटरचा टप्पाही पार करेल अशी आशा भारतीय चाहत्यांना असेल. नीरजला पीव्ही सिंधू आणि सुशील कुमार यांच्यानंतर सलग दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू बनण्याची संधी असेल.
पदकं मिळवण्यात दुहेरी आकडा गाठण्याचा प्रयत्न : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन जोडीवर देखील चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ते जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत, ते या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा प्रयत्न करतील. तसंच नेमबाजी हा आणखी एक खेळ आहे, ज्यात भारताला पदकाची अपेक्षा आहे. कारण मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी ऑलिम्पिकच्या तयारीत सातत्यपूर्ण कामगिरीनं अपेक्षा उंचावल्या आहेत. एकूण भारत गेल्या ऑलिम्पिकमधील पदकतालिकेची बरोबरी करणार, असं दिसतं. परंतु जर त्यांनी पदकं मिळवण्यात दुहेरी आकडा गाठला तर भारतीय चाहत्यांसाठी हे एक संस्मरणीय ऑलिम्पिक असेल.
हेही वाचा :