पॅरिस Paris Olympics 2024 Javelin Throw Prize Money : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भालाफेकच्या अंतिम फेरीत भारताच्या 'गोल्डन बॉय'ला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र, या 26 वर्षीय भारतीय खेळाडूनं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचला. ट्रॅक आणि फील्डमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. या स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं सर्वांना चकित करत ऑलिम्पिक विक्रम मोडीत काढला. नदीमनं 92.97 मीटर फेक करुन नवा ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे नदीमनं 32 वर्षांनंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं.
ARSHAD NADEEM 🇵🇰 SETS A NEW OLYMPIC RECORD IN THE MEN'S JAVELIN! 😱 pic.twitter.com/gnbAOKXQK5
— The Olympic Games (@Olympics) August 8, 2024
सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला किती बक्षीस : टोकियो ऑलिम्पिकपर्यंत, कोणत्याही विजेत्याला बक्षीस रक्कम दिली जात नव्हती. परंतु पॅरिस ऑलिम्पिक 2024 पासून, जागतिक ऍथलेटिक्सनं बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या भालाफेकपटू नदीमला सुवर्णपदक जिंकल्याबद्दल 50 हजार डॉलर्सचं बक्षीस देण्यात आलं. पाकिस्तानी रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 1 कोटी 40 लाख रुपये आहे. ही बक्षीस रक्कम कोणत्याही ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी दिली जाते. ॲथलेटिक्सशिवाय पॅरिस ऑलिम्पिकमधील इतर कोणत्याही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम देण्यात आलेली नाही.
What a moment for Bharat!
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 8, 2024
A Silver Medal for @Neeraj_chopra1. He has won his 2nd consecutive Olympic medal!
This incredible achievement is historic—no individual in independent Bharat has ever done it before in athletics. #Cheer4Bharat pic.twitter.com/kse90CBAEy
नीरज चोप्राला रौप्यपदक जिंकून काय मिळालं : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल जागतिक ॲथलेटिक्सकडून कोणतीही बक्षीस रक्कम मिळालेली नाही, कारण या ऑलिंपिकमध्ये जागतिक ॲथलेटिक्सनं केवळ सुवर्णपदक विजेत्यांसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. तथापि, 2028 मध्ये लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमधील रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना जागतिक ऍथलेटिक्स बक्षीस रक्कम देखील देईल.
SILVER MEDAL 🥈
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2024
A seasons best, and a second Olympic Medal for @Neeraj_chopra1 . What an athlete 👏🏽👏🏽#JeetKiAur | #Cheer4Bharat pic.twitter.com/lUHMFaPfUK
हेही वाचा :
- सुवर्णपदक गमावूनही नीरज चोप्रानं रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू - NEERAJ CHOPRA OLYMPIC RECORDS
- भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्य फेरीत पराभूत, उद्या कांस्यपदकासाठी लढणार - Paris Olympics 2024
- भारतीय हॉकी संघानं पॅरिसमध्ये 52 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती; स्पेनचा पराभव करत देशाला मिळवून दिलं चौथं पदक - paris olympics 2024