पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकीच्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. तब्बल 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारतीय हॉकी संघ यापूर्वीच उपांत्यपूर्व सामन्यात दाखल झालाय. मात्र या विजयामुळं त्यांचा आत्मविश्वास बळावला असेल. या सामन्यात भारतासाठी अभिषेक आणि हरमनप्रीत सिंग यांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी 3 सामने जिंकले, 1 सामना अनिर्णित राहिला आणि 1 सामना गमावला.
Hockey Men's Group Stage
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
The #MenInBlue played a terrific first half to lead Australia 2-1 at the break, with the seasoned goalkeeper PR Sreejesh making some terrific saves.
This is #TeamIndia's final Group Stage match at the #Paris2024Olympics. They have already qualified for… pic.twitter.com/vMzOwQb8iy
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचं वर्चस्व : या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये 12व्या मिनिटाला अभिषेकनं भारतीय संघासाठी अप्रतिम मैदानी गोल केला. ऑस्ट्रेलियन गोलकीपर थॉमस क्रेगकडं त्याच्या शानदार शॉटचं उत्तर नव्हतं. यासह त्यानं भारताचा स्कोअर 1-0 असा केला. यानंतर सामन्याच्या 13व्या मिनिटाला भारतानं पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि कर्णधार हरमनप्रीतनं अप्रतिम शॉट मारत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. या सामन्याच्या 15व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टॉमनं शॉट घेत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारताचा गोलरक्षक श्रीजेशनं त्याला वाचवलं. यासह भारतानं पहिल्या क्वार्टरचा शेवट 2-0 असा केला.
भारताकडून हरमनप्रीतनं केले 2 गोल : या सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिला गोल केला. सामन्याच्या 25व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियासाठी क्रेग थॉमसनं गोल करुन स्कोअर 2-1 असा केला. भारतानं तिसऱ्या क्वार्टरमध्ये तिसरा गोल केला. 32 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर हमनप्रीत सिंगने शॉट घेत संघासाठी गोल केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगनं या सामन्यातील तिसरा आणि दुसरा गोल केला. यासह त्यानं भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली.
भारतानं 3-2 नं जिंकला सामना : या सामन्यात गोव्हर्स ब्लेकनं 55व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियासाठी दुसरा गोल केला आणि स्कोअर 3-2 असा केला. यानंतर सामना संपेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि भारतानं हा सामना 3-2 असा जिंकला.
हेही वाचा :