Paris 2024 Olympics : येत्या 26 जुलैपासून 'पॅरिस ऑलिम्पिक 2024' ला सुरूवात होत आहे. ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा महाकुंभ, विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित क्रीडास्पर्धा आहे. जगतातून एकापेक्षा एक सरस खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी मैदानात उतरतात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठित क्रीडास्पर्धेत डोपिंगची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. डोपिंगची समस्या किती गंभीर आहे? खेळाडुंना कोणती शिक्षा होते? यावर एक नजर टाकूया.
Une inversion involontaire des couleurs pour donner naissance à une nouvelle version 🖼️
— Paris 2024 (@Paris2024) July 15, 2024
Inspiré par cette fausse manipulation, @ugogattoni s'est lancé dans la création d'une nouvelle version de l'affiche, modifiant chaque couleur une à une révélant ainsi de nouveaux secrets du… pic.twitter.com/0bYMVc6PVw
डोपिंग म्हणजे काय? : खेळाडूनं मादक द्रव्य अथवा उत्तेजक पदार्थांचे सेवन केले आहे का? हे तपासण्यासाठी डोपिंग चाचणी केली जाते. क्रीडा क्षेत्रात बंदी असतानाही स्टेरॉईड्स, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग केले जाते. कोणत्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षण शिबिरात डोपिंग चाचणी घेतली जाते. ही चाचणी 'विश्व डोपिंग संस्था' आणि 'राष्ट्रीय डोपिंग संस्था' यांच्याकडून घेतली जाते. खेळाडूच्या रक्ताचे नमुने आणि मुत्राचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, हे नमुने खेळाडूंसमोरच घेतले जातात. ते सिलबंद केले जातात. ते नमुने नाडाच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. तो खेळाडू 'A' चाचणीत दोषी आढळल्यास त्याचं तात्पुरतं निलंबंन केलं जातं. त्यानंतर तो खेळाडू 'B' चाचणीसाठी अपील करू शकतो. यावर या नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जाते. जर 'B' चाचणीतही खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा केली होते.
Paris Olympique, Paris Magique 🇫🇷
— Paris 2024 (@Paris2024) July 14, 2024
La ville lumière est déjà tournée vers les Jeux ✨#paris2024 pic.twitter.com/2lGplz6Fs7
डोपिंग प्रकरणात कोणती कारवाई होते ? : डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास खेळाडूचं तात्पुरतं निलंबन केलं जात. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचं बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच या चाचणीत दोषी आढळल्यास खेळाडूनं जिंकलेली पदके काढून घेतली जातात.
डोपिंगचा पहिला बळी कोण? : स्वीडनचा ऍथलीट हान्स-गुन्नर लिलजेनवाल (1968) हा डोपिंगमुळे पदक काढून घेतलेला पहिला खेळाडू होता. त्यानं नेमबाजीच्या स्पर्धेपूर्वी बिअरचे सेवन केले होते. तर पहिली हाय-प्रोफाइल केस कॅनडाच्या बेन जॉन्सनची होती. त्याचे 1988 च्या ऑलिम्पिकचे पदक काढून घेण्यात आले होते. जॉन्सननं 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत 9.79 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. परंतु त्याची डोपिंग चाचणी घेतल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर जॉन्सनचं रेकॉर्ड रद्द करण्यात आलं. त्याऐवजी सुवर्णपदक अमेरिकन कार्ल लुईसला देण्यात आलं. त्यानं 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत 9.920 सेकंद वेळ नोंदवली होती.
रशियन डोपिंग घोटाळा : रशियन सरकारनं ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये अधिक पदकं जिंकण्यासाठी आपल्या खेळाडूंना स्टिरॉइड्स आणि इतर औषधं पुरवली होती. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीला (WADA) रशियन फेडरेशनला अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. त्यानंतर वाडानं 2019 मध्ये रशियन फेडरेशनवर ऑलिम्पिकसह सर्व प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास रशियन फेडरेशनवर चार वर्षांसाठी बंदी घातली. 2020 मध्ये कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने (CAS) रशियाच्या आवाहनानंतर बंदी कालावधी दोन वर्षांपर्यंत कमी केला. डोपिंग प्रकरणात ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणाऱ्या रशियाच्या खेळाडूंवर सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. आजवर रशियाच्या 50 ऍथलीट्सची पदकंही काढून घेण्यात आली आहेत.
रशियन खेळाडूंवरील बंदी काय- 2016 च्या ऑलिंपिकमध्ये ब्राझीलमधील 389 पैकी 271 रशियन ऍथलीट्ला स्पर्धेसाठी मंजूरी देण्यात आली होती. यात 67 खेळाडूंचा समावेश होता. 23 मार्च 2023 रोजी जागतिक ऍथलेटिक्सनं (WA) घोषित केलं की, साडेसात वर्षांनंतर रशियाचं डोपिंग निलंबन मागं घेण्यात आलं आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे रशियन खेळाडूंवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती.
- 353 खेळाडू डोपिंगमुळे अपात्र : ऑलिम्पिकमध्ये विविध गुन्हे प्रकरणांमध्ये खेळाडूंकडून 42 सुवर्ण, 43 रौप्य आणि 48 कांस्य पदकांसह 133 ऑलिम्पिक पदकं काढून घेण्यात आली आहेत. 2020 ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धेत डोपिंगची नऊ प्रकरणं आढळली होती. ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 353 खेळाडूंना डोपिंगमुळे अपात्र ठरवण्यात आलं आहे.
हेही वाचा
- हार्दिकच नाही तर 'या' क्रिकेटपटूंचाही झालाय घटस्फोट; खेळाडूंची नावं वाचून बसेल धक्का! - Hardik Natasa Divorce
- अखेर हार्दिक-नताशाचं नातं तुटलं; दोनदा लग्न करुनही चार वर्षांत मोडला 'संसार' - Hardik Natasa Divorce
- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा; टी 20 संघात कर्णधाराचा 'सुर्यो'दय - Team India
- इंग्लंडनं रचला इतिहास...! 26 चेंडूत केलं असं काही, जे 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घडलं नाही - Fastest Team Fifty in Test