ॲडलेड Pakistan Beat Australia by 9 Wickets : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तान संघानं ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला. मेलबर्नमध्ये पराभवाची चव चाखणाऱ्या पाकिस्तानी संघानं ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला एकही संधी दिली नाही आणि दमदार विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
Pakistan draw level in the ODI series with a dominating performance in Adelaide 💪
— ICC (@ICC) November 8, 2024
🔗#AUSvPAK: https://t.co/wQ8DGaL5C7 pic.twitter.com/mcFUU8gWff
28 वर्षांनंतर कांगारुंचा पराभव : ॲडलेड वनडेत ऑस्ट्रेलियन संघ प्रचंड फ्लॉप ठरला. ना त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली ना त्यांचे गोलंदाज आपली ताकद दाखवू शकले. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत केवळ 163 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तान संघानं 26.3 षटकांत हे लक्ष्य सहज गाठलं. पाकिस्तानसाठी हा विजय खूप खास आहे, कारण त्यांनी ॲडलेडच्या मैदानावर 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. पाकिस्ताननं शेवटच्या वेळी 1996 मध्ये ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. तसंच पाकिस्तान संघानं ऑस्ट्रेलियात शेवटचा वनडे सामना 15 जानेवारी 2017 रोजी जिंकला होता. मेलबर्न इथं झालेल्या त्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर आता जवळपास साडेसात वर्षांनी पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात वनडे सामना जिंकला आहे.
Haris Rauf led the charge with a sensational five-wicket haul as Pakistan hold Australia back in Adelaide 💥
— ICC (@ICC) November 8, 2024
📝 #AUSvPAK: https://t.co/pRvFm58GSt pic.twitter.com/PUS5y7u72a
सॅम अयुब-हारिस रौफ यांनी मॅचविनींग खेळी : सॅम अयुब आणि हरिस रौफ यांनी उपयुक्त खेळी केली. सगळ्यात आधी हारिस रौफनं आपल्या वेगवान चेंडूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची मधली फळी उद्ध्वस्त केली. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजानं जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांची विकेट घेतली. हरिस रौफनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी केली आणि ॲडलेडच्या मैदानावर कोणत्याही पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
As commanding as it gets 💪@imabd28 and @SaimAyub7's brilliant innings lead Pakistan to a nine-wicket win with 141 balls to spare! 🏏#AUSvPAK pic.twitter.com/pgQ1o5qcTb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 8, 2024
सॅम अय्युबची आक्रमक फलंदाजी : हारिस रौफच्या कहरानंतर सॅम अयुबनं ऑस्ट्रेलियात कहर केला. स्फोटक शैलीत खेळणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजानं अवघ्या 71 चेंडूत 82 धावा केल्या. सॅम अय्युबनं आपल्या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकार लगावले. या खेळाडूनं स्टार्क, हेझलवूड, पॅट कमिन्स, झाम्पा या गोलंदाजांना सोडलं नाही. अयुबनं अब्दुल्ला शफीकसोबत 122 चेंडूत 137 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला सामन्यातून पूर्णपणे संपवलं. सॅम अय्युबनंतर अब्दुल्ला शफीकनंही शानदार अर्धशतक झळकावलं. शफिक 64 धावा केल्यानंतर नाबाद राहिला, बाबर आझमनंही 15 धावांची नाबाद खेळी केली. रविवारी पर्थमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे, जो मालिकेचा अंतिम सामना असणार आहे.
हेही वाचा :