मुलतान Kamran Ghulam Scored Century : पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझमचं नशीब त्याच्या वाढदिवशीच खराब झाल्याचं दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळलेल्या बाबरच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या कामरान गुलामनं पदार्पणाच्या कसोटीचत इंग्लंडला तारे दाखवले. कामराननं शतक झळकावून बाबरच्या कसोटी कारकीर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
THE NEW NUMBER 4 OF PAKISTAN....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 15, 2024
- Kamran Ghulam who replaced Babar Azam has scored a Hundred on his International debut. 🫡👌 pic.twitter.com/bTPyuMuMQW
बाबर आझमचा आज वाढदिवस : बाबर आझम आज 15 ऑक्टोबर रोजी त्याचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तो त्याच्यासाठी दुखःद ठरला. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाबरला वगळण्यात आल्याची चर्चा थांबली नसून बाबरसाठी पुन्हा एक वाईट बातमी आली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासाठी ही खूप चांगली बातमी आहे. बाबरच्या जागी आलेल्या कामराननं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना उत्कृष्ट शतक झळकावलं. त्यानं 224 चेंडूत 118 धावांची खेळी खेळली, ज्यात त्यानं 11 चौकार आणि 1 षटकार मारला.
Babar Azam's replacement has a Test century on debut. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 15, 2024
- What a knock by Kamran Ghulam. pic.twitter.com/lvnM0iZIzp
कामराननं केली शतकी खेळी : या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघ सुरुवातीलाच गडबडला. अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार मसूद यांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. मात्र, सॅम अयुबनं एक टोक सांभाळत 77 धावा केल्या. यानंतर कामराननं धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी घेतली. दुसऱ्या टोकाकडून विकेट्सचा पडत होत्या पण कामरान हा संघासाठी अडचणीचा निवारक ठरला.
.@KamranGhulam7 signs off his first innings in Test cricket with a splendid 1️⃣1️⃣8️⃣ 🫡#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/eY3UPtCGdX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2024
खराब फॉर्ममध्ये बाबर : बाबर आझम बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध बाबरनं अपेक्षा धुळीला मिळवल्या होत्या. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही तो फ्लॉप ठरला. ज्यानंतर त्याची संघातून हकालपट्टी करण्यात आली. 2022 पासून बाबरच्या बॅटमधून कसोटीत एकही मोठी खेळी आली नाही. आता कामराननं असाच खेळ सुरु ठेवला तर बाबरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पाकिस्ताननं पहिल्या दिवशी 5 विकेट गमावून सुमारे 259 धावा केल्या आहेत. आता या सामन्यात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :