नवी दिल्ली Bangladesh Beat Pakistan in Test : पाकिस्तान क्रिकेट जगभरातील चाहत्यांना चर्चेसाठी नवीन विषय देत आहेत. क्रिकेट बोर्डाचं नाटक असो, कर्णधारपद आणि क्रिकेट संघातील निवडीशी संबंधित मारामारी असो किंवा मैदानावरील संघाची लाजिरवाणी कामगिरी असो, पाकिस्तान क्रिकेट नेहमीच चर्चेत राहिलं आहे. या तिन्ही गोष्टी गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र सुरु आहेत. पण सध्या फक्त संघाच्या मैदानावरील कामगिरीबद्दल बोलूया, जी दिवसेंदिवस घसरत आहे. याचं ताजं दृश्य रावळपिंडीत पाहायला मिळाले, जिथं पाकिस्तानला बांगलादेशकडून 10 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह मागच्या तीन वर्षांत पाकिस्तानी संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये जगासमोर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
PAKISTAN CRICKET IN LAST 10 MONTHS:
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2024
- Group Stage in ODI World Cup
- Group Stage in T20I World Cup
- Lost the Test against Bangladesh
Pakistan cricket at their lowest point....!!!! pic.twitter.com/DWewTDKkn0
टी 20 विश्वचषक 2022 : याची सुरुवात टी 20 विश्वचषक 2022 पासून झाली. त्या विश्वचषकात पाकिस्तानी संघ निश्चितपणे फायनल खेळला होता. पण फायनलपूर्वी त्यांना सनसनाटी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा साखळी फेरीत मॅचमध्ये पाकिस्तानचा एका धावानं पराभव झाला होता. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद असे फलंदाज असूनही पाकिस्तानी संघ 131 धावांचं लक्ष्यही गाठू शकला नाही आणि पराभूत झाला.
एक दिवसीय विश्वचषक 2023 : टी 20 विश्वचषकानंतर एकदिवसीय फॉरमॅटची पाळी आली आणि यावेळीही पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्येच अपमानजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचा पराभव झाला होता. तेव्हा चेन्नई इथं खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघानं 282 धावा केल्या आणि अफगाणिस्ताननं केवळ 2 विकेट्स गमावून पाकिस्तानचा 8 विकेटनं पराभव केला होता. अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय ठरला. मात्र, त्या विश्वचषकात अफगाणिस्ताननं इतर संघांना धक्का देत चमकदार कामगिरी केली होती.
Pakistan at home in Test cricket since 2022:
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2024
- Draw vs AUS.
- Draw vs AUS.
- Lost vs AUS.
- Lost vs ENG.
- Lost vs ENG.
- Lost vs ENG.
- Draw vs NZ.
- Draw vs NZ.
- Lost vs BAN.
This is one of the toughest times ever in Pakistan history. pic.twitter.com/OyEd768HJE
टी 20 विश्वचषक 2024 : हे वर्ष पाकिस्तानसाठी आत्तापर्यंतचं सर्वात लाजिरवाणं ठरत आहे. ज्यात दोन सामने त्यांच्या क्रिकेट इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवले जातील. 6 जूनचा तो दिवस होता जेव्हा टी 20 विश्वचषकात नव्यानं तयार झालेल्या अमेरिकन संघानं त्यांना धक्का दिला होता. पाकिस्ताननं तो सामना कसा तरी बरोबरीत सोडवला पण त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं शानदार विजय नोंदवला. या पराभवाचा परिणाम असा झाला की पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.
कसोटी क्रिकेट : एकदिवसीय आणि टी 20 मध्ये लाजिरवाणे सामना केल्यानंतर, कसोटी क्रिकेटची पाळी आली आणि शेवटी इथंही अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. रावळपिंडी इथं सलग 4 दिवस उत्कृष्ट क्रिकेट खेळल्यानंतर 25 ऑगस्ट रोजी पाचव्या दिवशी बांगलादेशनं दुसऱ्या डावात पाकिस्तानला अवघ्या 146 धावांत गुंडाळलं. त्यामुळं त्यांना केवळ 30 धावांचं लक्ष्य मिळालं. अशाप्रकारे बांगलादेशनं या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करुन अविस्मरणीय विजय मिळवला.
हेही वाचा :