Paris Olympics 2024 : जगभरातील क्रीडाप्रेमांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिक 2024 वर खिळल्या आहेत. या स्पर्धेत 206 देशातील 10,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. 1896 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा खेळवण्यात आली. ऑलिम्पिकचं आयोजन करणारा देश किती कमवतो? या स्पर्धेसाठी किती पैसा खर्च होतो? यजमान देश आणि शहराची अर्थव्यवस्था प्रत्येक वेळी भरभराटीला येते का? यावर एक नजर टाकूया.
Magnifique! 😍🎆
— The Olympic Games (@Olympics) July 15, 2024
The Olympic flame has arrived in Paris in style, with the iconic Eiffel Tower lit up by spectacular Bastille Day celebrations.#Olympics | @Paris2024 pic.twitter.com/Re6Swopej4
देश आर्थिक संकटाशी झुंजत आहेत : 1976 मध्ये ऑलिंपिक कॅनडामधील मॉन्ट्रियल आयोजित करण्यात आलं होतं. आयोजन केल्यानंतर या शहरावर 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज होतं. बीजिंगनं 2008च्या ऑलिम्पिकवर 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केले. यातून चीनला 3.6 अब्ज डॉलर मिळाले. म्हणजेच बीजिंगचं 35 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं. लंडनने ऑलिम्पिकसाठी 18 अब्ज डॉलर खर्च केल्यानंतर केव 5 अब्ज डॉलर मिळाले. ब्रिटनला 13 अब्ज डॉलरचा तोटा झाला. रिओ ऑलिम्पिकचं अंदाजे बजेट सुमारे 65 हजार कोटी रुपये होते. तर खर्च सुमारे 98 हजार कोटी रुपये झाला. त्यामुळे ब्राझीलला सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं. 1972 मध्ये डेन्व्हर हे यजमानपदाची संधी नाकारणारं पहिलं आणि एकमेव शहर होतं.
Olympic World presented by @Visa is live on @Roblox! Compete, explore, and celebrate the Olympic Games in a whole new way.
— The Olympic Games (@Olympics) July 20, 2024
To celebrate we are giving away free UGC once we cross 1000 likes.
Like and redeem your UGC at the link in bio!#roblox #olympics #LetsMove #Paris2024 pic.twitter.com/yKke5qOEzd
फक्त 1984 मध्ये यजमान देशाला झालाय फायदा : 1984 च्या ऑलिम्पिकचं आयोजन अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरानं केलं होतं. लॉस एंजेलिस शहराला सुमारे 250 दशलक्ष डॉलर्सचा नफा झाला. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना पायाभूत सुविधांवर फारसा खर्च करावा लागला नाही. लॉस एंजेलिस हे आधीच विकसित शहर असल्यामुळं तिथं क्रीडा संस्कृती होती. त्यांनी फक्त दोन नवीन स्टेडियम बांधले. उर्वरित कार्यक्रम आधीच बांधलेल्या स्टेडियममध्ये झाले. तसेच सोव्हिएत युनियनच्या बहिष्कारामुळे खेळाडू आणि चाहत्यांची संख्या कमी होती. त्यामुळे कमी खर्चात ऑलिम्पिकचं यशस्वी आयोजन करण्यात आलं.
Can't wait until Friday's #Paris2024 Opening Ceremony? We got you. 🤝
— The Olympic Games (@Olympics) July 20, 2024
Enjoy a non-stop marathon of past Olympic Opening Ceremonies on our website, and get into the Olympic spirit ahead of next week!
➡️ Watch now: https://t.co/1ZXFbPCljA pic.twitter.com/7TVAA2hYMs
ऑलिम्पिक स्पर्धेत तोटा का होतो? : ऑलिम्पिकसाठी शहरात मोठमोठी स्टेडियम, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बांधली जातात. परंतु यजमान देशाला याचा फायदा होत नाही. कारण बहुतेक उत्पादक कंपन्या या आंतरराष्ट्रीय आहेत. ऑलिम्पिकचं क्रीडांगणासाठी बांधण्यात आलेल्या स्टेडियमच्या देखभालीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. 2000 ऑलिम्पिक सिडनी येथे आयोजित करण्यात आले होते. सिडनी स्टेडियमवर दरवर्षी 200 कोटींहून अधिक खर्च होतो. बीजिंगच्या बर्ड्स नेस्ट एरिनाच्या देखभालीसाठी वार्षिक 83 कोटी रुपये खर्च येतो.
Le Relais bat son plein dans l'Aisne aujourd'hui ! 🔥
— Paris 2024 (@Paris2024) July 17, 2024
La Flamme entame ses derniers jours de Relais et vous êtes toujours au rendez-vous en bord de route, prêts à immortaliser ce moment unique pour nos éclaireurs 📸
Pour suivre en direct RDV sur https://t.co/Qd7ZWXqg64 :… pic.twitter.com/QTj3qeGG14
जपानचं 4800 कोटी रुपयांचं नुकसान : शेवटचं ऑलिम्पिक जपानमधील टोकियो येथं झालं. कोरोना महामारीमुळं एकाही प्रेक्षकाला येथे प्रवेश दिला नाही. पूर्ण ऑलिम्पिक स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये पार पडली. यामुळं जपानचं सुमारे 4800 कोटी रुपयांचं नुकसान झालं. टोकियो ऑलिम्पिक आधी 2020 मध्ये होणार होते. पण कोरोनामुळे ते वर्षभरानंतर म्हणजेच 2021 मध्ये आयोजित करण्यात आलं.
2032 ऑलिम्पिक भारतात होणार? : 2024 आणि 2028 ऑलिम्पिकसाठी पाच शहरांनी बोली केली होती. यामध्ये पॅरिस, लॉस एंजेलिस, बुडापेस्ट, हॅम्बर्ग आणि रोम यांचा समावेश होता. पण बुडापेस्ट, हॅम्बर्ग आणि रोम यांनी आर्थिक नुकसानीच्या संभाव्यतेमुळं माघार घेतली. त्यानंतर पॅरिसला 2024 ऑलिम्पिक आणि लॉस एंजेलिसला 2028 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळालं. 2032 च्या ऑलिम्पिकसाठीही भारत दावा करणार आहे. हे ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा
- बीसीसीआयचे सचिव जय शाहांची मोठी घोषणा, पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना जाहीर केली मदत - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये कोणत्या राज्यातील किती खेळाडूंचा सहभाग? हरियाणाचे 24 खेळाडू, महाराष्ट्राचे फक्त... - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कोणत्या वेळी होणार सामने, जाणून घ्या एका क्लिकवर - Paris Olympic 2024