पर्थ Jasprit Bumrah and Pat Cummins Will Creates History : क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 1877 साली मेलबर्न इथं खेळला गेला. या सामन्याला 147 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात एकापेक्षा जास्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. आता भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरु होईल. या सामन्यात नाणेफेक होताच क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार आहे.
Only one side will have their hands on it in the end #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/XCv4S8n2iA
— cricket.com.au (@cricketcomau) November 21, 2024
जसप्रीत बुमराह असेल भारताचा कर्णधार : वास्तविक, भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. रोहित शर्मा सध्या भारतात असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्थमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. जसप्रीत बुमराह उद्या सकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससोबत पर्थ कसोटीत नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल तेव्हा मैदानावर एक विलक्षण दृश्य दिसेल. अशा प्रकारे बुमराह आणि कमिन्स मिळून कसोटीत एक अनोखा विक्रम नोंदवतील.
Less than a day to go ⏳
— ICC (@ICC) November 21, 2024
Australia and India face off in the crucial Border-Gavaskar Trophy series, starting tomorrow 🏆
Who are you cheering for?#WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/pQo0YSHvhc
कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचं नेतृत्व केल्याचं क्वचितच घडलं आहे. आता हा मोठा चमत्कार पर्थमध्ये घडणार आहे, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघंही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असं फक्त 5 वेळा घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधार वेगवान गोलंदाज होते.
कर्णधार म्हणून कामगिरी कशी : उल्लेखनीय आहे की जसप्रीत बुमराहनं केवळ एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, तर पॅट कमिन्सनं दीर्घकाळ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. 2022 मध्ये इंग्लंडमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात बुमराहनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर पॅट कमिन्सनं 28 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. यात ऑस्ट्रेलियानं 17 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
The Aussies are gearing up for the big challenge ahead 🏏#AUSvIND | #WTC25 pic.twitter.com/Lcp86WRLsL
— ICC (@ICC) November 21, 2024
जेव्हा वेगवान गोलंदाजांनी एकाच कसोटी सामन्यात दोन्ही संघांचं नेतृत्व केलं :
- बॉब विलिस (इंग्लंड) विरुद्ध इम्रान खान (पाकिस्तान), 1982 (बर्मिंगहॅम)
- वसीम अक्रम (पाकिस्तान) विरुद्ध कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज), 1997 (पेशावर)
- हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) विरुद्ध शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), 2001 (बुलावायो)
- जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) विरुद्ध सुरंगा लकमल (श्रीलंका), 2018 (ब्रिजटाऊन)
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध टिम साउदी (न्यूझीलंड), 2024 (ख्रिस्टचर्च)
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध जसप्रीत बुमराह (भारत), 2024 (पर्थ)*
हेही वाचा :