ETV Bharat / sports

ऑलम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात ग्रँड वेलकम; स्वागतानं भारावला कुसाळे परिवार - Swapnil Kusale - SWAPNIL KUSALE

Swapnil Kusale : 72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आला. यावेळी कोल्हापूरकरांनी मिरवणूक काढत स्वप्नील कुसाळेचं स्वागत केलं.

Swapnil Kusale
स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 9:33 PM IST

कोल्हापूर Swapnil Kusale : 72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे पदक जिंकल्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ऑलम्पिकवीर स्वप्नीलचं ताराराणी चौकातून सजवलेल्या जीपमधून कोल्हापुरातील जनतेनं भव्य स्वागत केलं. ताराराणी चौक आणि दसरा चौकात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्याचं स्वागत करण्यात आलं. कोल्हापूरकरांनी केलेल्या स्वागतानं संपूर्ण कुसळे परिवार भारावून गेला.

स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत (Source - ETV Bharat Reporter)

स्वप्नीलचं जल्लोषात स्वागत : राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे राहणाऱ्या स्वप्नीलनं ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नीलचं जंगी स्वागत केलं जाईल, असे सांगितले होतं. पदक घेऊन आलेल्या स्वप्नीलचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातील ताराराणी चौकातून करवीर संस्थापक छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी खुल्या जीपमधून स्वप्नीलसह त्याची आई, वडील आणि प्रशिक्षक यांच्यावरही पुष्पवृष्टी करण्यात आली. तर दुसऱ्या जीपमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण : पारंपारिक वेशभूषेत आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कोल्हापुरातील नागरिकांनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानक परिसर, व्हीनस कॉर्नर मार्गे ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर स्वप्नीलच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की : स्वप्नीलच्या स्वागतासाठी ताराराणी चौकात मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे कॅमेरामन पत्रकाराच्या अंगावर धावून जाताना आणि त्याला हातवारे करून इशारा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्येष्ठ छायाचित्रकारांनाही पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा कोल्हापूर प्रेस क्लबनं निषेध नोंदवला आहे. जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला कोल्हापूरच्या पत्रकारांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांनी सांगितला स्वप्नीलचा तो किस्सा : मिरवणुकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्वप्नील कुसाळे याच्या प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांनी स्वप्नीलला गेल्या बारा वर्षात एकदाच ओरडल्याचा किस्सा सांगितला, "पहाटे पाच वाजता उठणारा स्वप्नील एके दिवशी दुपारी दोन वाजले तरीही रेंजवर आला नव्हता. तेव्हा मी स्वप्नीलला सरावाबाबत खडे बोल सुनावले," असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा

  1. नाव मोठं लक्षण खोटं... वनडे क्रिकेटमधल्या अव्वल फलंदाजाचा दोन चेंडूत खेळ खल्लास, कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहावा लागला 'हा' दिवस - PAK vs BAN
  2. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाता येईलं? वाचा एका क्लिकवर - pak vs ban live streaming in india
  3. जय शाह होणार जागतिक 'क्रिकेटचे बॉस'? विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण - Jay Shah ICC Chairman

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.