दुबई NZW vs PAKW Live Streaming : युएईत सुरु असलेल्या ICC महिला T20 विश्वचषकाचा 19 वा सामना आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. हा सामना पाकिस्तान आणि न्यूझिलंड सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं भवितव्य अवलंबून असेल.
All eyes on the final game of Group A 👀
— ICC (@ICC) October 14, 2024
More 👉 https://t.co/Ds2M5udzF7#T20WorldCup | #WhateverItTakes pic.twitter.com/S6tEvgWdBF
भारतासाठी सामना महत्त्वाचा : या T20 विश्वचषकात पाकिस्तान संघानं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात एका सामन्यात विजयाची नोंद झाली आहे. तर 2 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, पाकिस्तान संघ न्यूझीलंडला मोठ्या फरकानं पराभूत करण्याचा प्रयत्न करेल आणि T20 विश्वचषकात आपला दुसरा विजय नोंदवू इच्छित आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघानं T20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्याथ 2 सामने जिंकले आहेत. तर एकात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला पाकिस्तानविरुद्ध तिसरा विजय नोंदवावा लागेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान महिला आणि न्यूझीलंड महिला संघ आतापर्यंत 11 वेळा T20 मध्ये खेळले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडनं 9 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ आज न्यूझीलंडविरुद्ध T20 मध्ये तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्यानं उतरणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला 2-1 नं पराभूत करुन आशिया आणि आयर्लंडबाहेर एकमेव मालिका जिंकली होती. या फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा त्यांचा एकमेव मालिका विजय होता.
The final push for a spot in the @T20WorldCup semi-final! Watch LIVE in NZ on @skysportnz 📺 Live scoring at https://t.co/DibXOCLmmf & the NZC App📲 #T20WorldCup #CricketNation pic.twitter.com/yD8iFUrEZ5
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 14, 2024
खेळपट्टी कशी असेल : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये हलके स्विंग पाहू शकतात. तर, फलंदाजांनाही सुरुवातीला सावध राहावं लागेल, परंतु एकदा स्थिरावल्यानंतर खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे सोपं होऊ शकतं. याशिवाय, अधिक सामन्यांमुळं दुबईची खेळपट्टी सामना जसजसा पुढं जाईल तसतशी संथ होण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संघांना पहिल्या डावात किमान 150 धावा कराव्या लागतील. दुसऱ्या डावात दव पडल्यास त्याचा परिणाम गोलंदाजांवर होऊ शकतो, त्यामुळं फलंदाजी सोपी होऊ शकते. नाणेफेक जिंकणारा संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
हवामान कसं असेल : दुबईतील हवामान दुपारच्या वेळी खूप उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल अशी अपेक्षा आहे. संध्याकाळी सामन्यादरम्यान हवामान उष्ण असेल, आकाश निरभ्र असेल आणि पावसाची शक्यता नाही. तर अपेक्षित तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना सोमवार, 14 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघं यातून निवडणार :
पाकिस्तान महिला संघ : मुनिबा अली (यष्टटिरक्षक/कर्णधार), सिद्रा अमीन, सदाफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, इरम जावेद, तुबा हसन, सय्यदा अरुब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बेग, गुल फिरोझा, फातिमा प्रिय, तस्मिया तस्मिया रूबर्ब
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गॅझे (यष्टटिरक्षक), लेह कॅस्परेक, ली ताहुहू, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, हन्ना रो, जेस केर, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड
हेही वाचा :