ETV Bharat / sports

'बॅझबॉल'च्या घरच्या मैदानावर इंग्रजांचे 'तारे जमीन पर'...! सर्वात मोठा विजय मिळवत कीवींचा 'टीम'ला 'गुड बाय' - NEW ZEALAND BIGGEST TEST WIN

हॅमिल्टन इथं खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडनं इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. न्यूझीलंडनं हा सामना 423 धावांनी जिंकला.

New Zealand Biggest Win
टीम साऊदीला विजयी निरोप (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 17, 2024, 10:22 AM IST

हॅमिल्टन New Zealand Biggest Win : हॅमिल्टन इथं खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान कीवी संघानं इंग्लंडचा तब्बल 423 धावांच्या मोठ्या फरकानं एकतर्फा पराभव केला. या सामन्यातील विजयासह न्यूझीलंडनं आपला क्लीन स्वीप वाचवला. यासोबतच इंग्लंडनं तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात कीवी संघानं निश्चितच विक्रमी कामगिरी केली. या सामन्यासह त्यांनी आपला सहकारी टीम साऊथीला क्रिकेटमधून भव्य निरोप दिला. टीम साऊदीनं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा आधीच केली होती.

न्यूझीलंडचा सर्वात मोठा विजय : वास्तविक, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. कीवी संघानं मालिकेतील शेवटचा सामना 423 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला. पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडनं मालिका जिंकली. हा सामना टीम साऊदीचा शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात त्यानं 2 बळी घेतले. त्याच वेळी, धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा संयुक्त विजय ठरला. यापूर्वी एकदा न्यूझीलंडनं 2018 मध्ये श्रीलंकेचा 423 धावांच्याच फरकानं पराभव केला होता.

इंग्लंडचा पहिला डाव गडगडला : तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड संघाचा कर्णधार बॅन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडनं पहिल्या डावात 347 धावा केल्या, त्यात मिचेल सँटनरनं 76 धावा, टॉम लॅथमनं 61 आणि केन विल्यमसननं 44 धावा केल्या. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सनं चार विकेट घेतल्या. यानंतर इंग्लंडचा संघ 143 धावांवर गडगडला. मॅट हेन्रीनं 4 तर विल ओ'रुर्क आणि मिचेल सँटनरनं प्रत्येकी 3 बळी घेतले.

इंग्लंडला महाकाय लक्ष्य : 204 धावांची आघाडी असतानाही न्यूझीलंडनं इंग्लंडला फॉलोऑन दिला नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघासाठी केन विल्यमसननं दमदार शतक झळकावलं. तो 156 धावा करुन बाद झाला. विल यंग आणि डॅरिल यांनी 60-60 धावा केल्या. सँटनरनं 49 धावा केल्या, तर रचिन-टॉम ब्लंडेलनंही 44-44 धावा केल्या. अशा प्रकारे या डावात न्यूझीलंडनं 453 धावा केल्या आणि इंग्लंडला 658 धावांचं महाकाय लक्ष्य मिळालं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 234 धावा करुन गडगडला आणि किवी संघाने 423 धावांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला.

टीम साऊदीला विजयी निरोप : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेणार असल्याचं टीम साऊदीने आधीच जाहीर केलं होतं. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडचा 423 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. अशाप्रकारे टीम साऊथीचा विजयी निरोप होता, जो तो आणि चाहते कधीही विसरणार नाहीत.

हेही वाचा :

  1. नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात पाहुणा संघ आफ्रिकेवरुद्ध तीन वर्षांनी सामना जिंकणार? 'इथं' पाहा फ्रीमध्ये मॅच
  2. इंग्रज गोलंदाजाचा 'कीवीं'विरुद्ध महापराक्रम... 43 वर्षांनंतर एखाद्या गोलंदाजानं केला 'असा' रेकॉर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.