माउंट माउंगानुई NZ Beat SL in 2nd T20I : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 45 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघानं मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
Jacob Duffy and Mitchell Hay shine as New Zealand take an unassailable 2-0 lead in the T20I series 👌#NZvSL 📝: https://t.co/e38jyyMsQM pic.twitter.com/xlXqkXyNLl
— ICC (@ICC) December 30, 2024
कीवींची आव्हानात्मक मजल : दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 13 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला. मात्र यानंतर सर्व फलंदाजांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीनं न्यूझीलंड संघानं 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमननं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान मार्क चॅपमनने 29 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मार्क चॅपमनशिवाय टीम रॉबिन्सन आणि मिचेल हे यांनी 41-41 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगानं सर्वाधिक दोन बळी घेतले. वानिंदू हसरंगाशिवाय नुवान तुषारा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Series secured! Career-best T20I figures from Jacob Duffy (4-15) turning the game again with the ball, with support from Mitchell Santner (2-22) and Matt Henry (2-31). Scorecard | https://t.co/7h7R8dYvTv 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/iM9bWtpRj6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 30, 2024
A series victory to start the tenure 😃 pic.twitter.com/ZNP0hY4Xs0
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 30, 2024
पुन्ही फलंदाजी कोसळली : यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघानं पहिल्या सामन्याप्रमाणेच चांगली कामगिरी केली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावा फलकावर लावल्या. एकवेळ सामन्यात त्यांनी स्थिती 3 बाद 127 होती. मात्र यानंतप पहिल्या सामन्याप्रमाणे त्यांची फलंदाजी गडगडली आणि 14 धावांत त्यांनी 7 विकेट गमावल्या. परिणामी श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकात अवघ्या 141 धावांवर गारद झाला. श्रीलंकेसाठी स्टार फलंदाज कुसल परेरानं सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. कुसल परेराशिवाय पथुम निसांकानं 37 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र अपयश आलं. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज जेकब डफीनं पुन्हा घातक गोलंदाजी करत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जेकब डफीशिवाय मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 जानेवारी रोजी सकाळी 5:45 वाजता नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.
It's all on at Bay Oval! How things stand with six overs remaining in the Sri Lanka chase. Follow play LIVE in NZ with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/7h7R8dYvTv 📲 #NZvSL pic.twitter.com/GNJmHYttUx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 30, 2024
हेही वाचा :