बेंगळुरु After 36 Years New Zealand Won test Match in India : भारतीय क्रिकेट संघाचा पराभव करत न्यूझीलंडनं बंगळुरु कसोटी सामना जिंकला आहे. यासह कीवी संघानं इतिहासही रचला. त्यांनी 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी सामन्यातील विजयाची पटकथा लिहिली. न्यूझीलंडनं 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावरील विजयानंतर पहिल्यांदाच कीवी संघानं भारतात कसोटी विजयाचा झेंडा फडकावला आहे. बेंगळुरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतीय संघाचा 8 विकेट्सनं पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
— BCCI (@BCCI) October 20, 2024
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
न्यूझीलंडनं 107 धावांच्या लक्ष्याचा केला पाठलाग : भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. किवी संघाच्या 10 विकेट्स होत्या आणि ही धावसंख्या गाठण्यासाठी संपूर्ण दिवसाचा खेळ शिल्लक होता. अशा स्थितीत ते विजयाचे प्रबळ दावेदार होते आणि अगदी तसंच घडलं. न्यूझीलंडनं केवळ 2 विकेट्स गमावून सामना जिंकला.
रचिन आणि यंगनं दिला ऐतिहासिक विजय मिळवून : विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी मिळून न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 21व्या शतकातील न्यूझीलंडचा भारतीय भूमीवरील हा पहिला विजय आहे. कारण 1988 मध्ये शेवटचा विजय नोंदवल्यानंतर न्यूझीलंडनं भारतात कधीही कसोटी जिंकली नव्हती. पण, ही प्रतीक्षा आता संपली आहे.
A memorable win for New Zealand as they take a 1-0 lead in the #WTC25 series against India 👊#INDvNZ | 📝 Scorecard: https://t.co/Ktzuqbb61r pic.twitter.com/sQI74beYr8
— ICC (@ICC) October 20, 2024
45व्यांदा केला मोठा पराक्रम : बंगळुरुमध्ये भारताला हरवून न्यूझीलंडनं आणखी एक चमत्कार केला. पहिल्या डावात 200 हून अधिक धावांची आघाडी घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटमधील 45 वा विजय नोंदवला. न्यूझीलंडनं आतापर्यंत 59 कसोटी सामन्यांच्या पहिल्या डावात 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे आणि त्यापैकी एकाही डावात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्या 59 पैकी त्याने 45 जिंकले आणि 14 सामने अनिर्णित राहिले.
भारत-न्यूझीलंड बेंगळुरु कसोटी सामना कसा राहिला : बेंगळुरु कसोटीच्या संपूर्ण सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा पहिला डाव 46 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402 धावा केल्या. किवी संघाला ही धावसंख्या गाठण्यात मदत करण्यात रचिन रवींद्रनं मोठी भूमिका बजावली, ज्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरं आणि भारताविरुद्ध तसंच परदेशी भूमीवर पहिलं शतक झळकावलं. न्यूझीलंडला पहिल्या डावात 356 धावांची आघाडी मिळाली. यानंतर सर्फराज खानचं शतक आणि ऋषभ पंतच्या 99 धावांच्या दमदार खेळीमुळं भारतानं न्यूझीलंडच्या आघाडीतून सावरलं, पण पराभव टाळता आला नाही.
हेही वाचा :