हैदराबाद Arshad Nadeem Pakistan : अर्शद नदीम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यानं 92.97 मीटर फेक करुन ऑलिम्पिक विक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवलं. यासह अर्शदनं पाकिस्तानचा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा 32 वर्षांचा दुष्काळ संपवला. यानंतर पाकिस्तान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी सांगितलं की, पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आमंत्रित करताना मला आनंद होईल.
Rolling back the years ⏪
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 15, 2024
Pakistan assistant coach Azhar Mahmood bowls to Babar Azam in the nets 🏏#PAKvBAN pic.twitter.com/zWGk6YLzET
ड्रेसिंग रुममध्ये येण्याचं आमंत्रण : गिलेप्सी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पॉडकास्टमध्ये म्हणाले, 'आम्हाला अर्शद नदीमला ड्रेसिंग फॉर्ममध्ये बोलवायला आवडेल. त्याचं ड्रेसिंग रुममध्ये येणं आणि सुवर्णपदक सामायिक करणं हे संघाला प्रोत्साहन देणारं ठरेल. विशेषत: ऑलिम्पिक अजूनही चर्चेत असताना. हा एक चांगला क्षण असेल आणि मी त्याला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये येण्याचं खुलं आमंत्रण देतो. अर्शदची संघातील खेळाडूंसोबतची भेट त्यांच्या आत्मविश्वासासाठी चांगली ठरेल,' असा विश्वास पाकिस्तान कसोटी संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
Levelling 🆙 the game before we face Bangladesh in the Test series 💪#PAKvBAN pic.twitter.com/aLe9QAFuU6
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 15, 2024
अर्शदच्या कामगिरीमुळं पाकिस्तानी संघावर दडपण येईल का : पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदला विचारण्यात आलं की अर्शदच्या कामगिरीमुळं संघासाठी प्रेरणा होण्यापेक्षा अधिक दबाव निर्माण होईल का? यावर मसूद म्हणाला, मी याला दबाव म्हणून पाहत नाही, तर हा सन्मान आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अर्शदच्या यशामुळं आपणही आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करु शकतो याची प्रेरणा मिळाली आहे.
Red-ball head coach Jason Gillespie and Test captain Shan Masood address the concern of fear of failure and shed light on the importance of a strong dressing room culture 🗣️
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 14, 2024
📺 https://t.co/4wUmRKddnn
🗒️ https://t.co/JxKlBjfVC0
🎧 https://t.co/QK0aNoNSmX
⏪… pic.twitter.com/hfiGZu87Lr
आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं पाकिस्तानचं लक्ष्य : 2017 पासून पाकिस्ताननं एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. या संघानं 2017 मध्ये अंतिम फेरीत भारताचा पराभव करुन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात आणि यंदाच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती आणि संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.
हेही वाचा :