ETV Bharat / sports

अभिमानास्पद...! ठाण्याच्या 'हिरकणी'नं 10व्या वर्षी सर केलं रशियातील बाझार्डुझू शिखर - Mountain Bazarduzu

Mountain Bazarduzu : महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ग्रिहिथा सचिन विचारे हिनं 26 ऑगस्ट 2024 रोजी बाझार्डुझू शिखर यशस्वीरित्या सर केलं आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकवला.

Mountain Bazarduzu
ठाण्याच्या 'हिरकणी'नं 10व्या वर्षी सर केलं रशियातील बाझार्डुझू शिखर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 29, 2024, 7:56 PM IST

ठाणे Mountain Bazarduzu : रशियाच्या सीमेवर वसलेले अझरबैजान मधील सर्वात उंच पर्वत बाझार्डुझू आहे. ठाण्याची रहिवासी महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ग्रिहिथा सचिन विचारे हिनं 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.20 वाजता बाझार्डुझू शिखर यशस्वीरित्या सर केलं आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकवला.

ठाण्याच्या 'हिरकणी'नं 10व्या वर्षी सर केलं रशियातील बाझार्डुझू शिखर (ETV Bharat)

बाझार्डुझू सर करत रचला इतिहास : रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलांकडून मोहिमेची परवानगी मिळाल्यानंतर ग्रिहिथानं 24 ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांसह, अझरबैजान मधील Expedition टीम आणि भारताच्या Fly High Expeditions टीमसह चढाई सुरु केली आणि 26 ऑगस्ट रोजी ही मोहीम यशस्वी केली. हा शिखरा सर करुन ग्रिहिथानं केवळ तिची अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवलं नाही तर माउंट बाजारदुझू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहासही रचला आहे.

सहाव्या वर्षांपासून करते पर्वतारोहण : ग्रिहिथा वयाच्या 6 व्या वर्षापासून पर्वतारोहण करत आहे, त्यात तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत आणि आत्तापर्यंत पर्वतारोहण क्षेत्रात 8 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि 1 एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावं आहेत. बाझार्डुझू हे ग्रिहिथाचं चौथं आंतरराष्ट्रीय यश असून ह्या आधी ग्रिहिथानं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेपाल मधील Mount Everest Base Camp वयाच्या 8 व्या वर्षी तर जगातला सर्वात उंच शिखर (Standalone) आफ्रिका मधील किलीमांजारो पर्वत आणि मलेशिया येथील माउंट किनाब्लू शिखर ही वयाच्या 9 व्या वर्षी सर केले आहेत. ही शिखरं सर करणारी ग्रिहिथा ही सर्वात कमी वयाची भारतीय ठरली आहे.

देशासाठी अभिमानास्पद : सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका असं अनेक कठीण ट्रेक सुद्धा ग्रिहिथानं अतिशय कमी वयात सर केले आहेत. ग्रिहिथाचं बाझार्डुझूचं यश हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि सर्वत्र तरुण साहसींसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा :

  1. कोल्हापूरातील क्रीडा कीर्ति स्तंभ अद्यावत कधी होणार? 64 वर्ष जुन्या किर्तीस्तंभाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष - Kirti Stambh Kolhapur
  2. एक-दोन नव्हे तर 13 वेळा डोक्याला लागला चेंडू; 26 वर्षाय खेळाडूला घ्यायला लावली सक्तीची निवृत्ती? - Will Pucovski
  3. इंग्लंड-श्रीलंका दुसरा कसोटी सामना कुठे आणि कसा बघायचा 'फ्री'? वाचा एका क्लिकवर - ENG vs SL 2nd Test

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.