अल अमेरत (ओमान) 6 Batters out on Zero : ICC क्रिकेट विश्वचषक लीग-2 मध्ये ओमानच्या संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी झालेल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यातही ओमान संघानं एकतर्फी विजय मिळवला. पण युएईचा संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. संघाचा एकही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही, त्यामुळं UAE संघाचं नाव लाजिरवाण्या यादीत समाविष्ट झालं. या लाजिरवाण्या यादीत यापूर्वी केवळ पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांचं नाव होतं.
Oman survive a scare at the end to make it 3️⃣ wins in a row in the #CWCL2 💪
— ICC (@ICC) November 7, 2024
Catch the tournament live on https://t.co/WngPr0Ns1J (in select regions) 📺#UAEvOMA: https://t.co/b0PjJAVQ5z pic.twitter.com/oDwlVvGI0a
UAE संघाची अवस्था वाईट : ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. या डावात UAE चे एक दोन नव्हे तर तब्बल 6 फलंदाज आपलं खातंही उघडू शकले नाहीत म्हणजे ते शुन्यावर बाद झाले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही सहावी वेळ होती, जेव्हा एका संघाचे 6 फलंदाज वनडे सामन्यात खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. याआधी पाकिस्तान संघानं हा लाजिरवाणा विक्रम तीनदा केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या संघांनाही एकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.
ओमानची घातक गोलंदाजी : UAE च्या या डावात आर्यांश शर्मा, विष्णू सुकुमारानी, कर्णधार राहुल चोप्रा, अयान खान, ध्रुव पराशर आणि राहुल भाटिया आपलं खातं न उघडताच बाद झाले. त्यामुळं UAE नं प्रथम फलंदाजी करताना 25.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 78 धावा केल्या. त्याचबरोबर या सामन्यात शकील अहमद ओमानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शकील अहमदनं 10 षटकांत केवळ 23 धावा दिल्या आणि 5 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय जय ओडेद्रालाही 2 बळी घेण्यात यश आलं. मुजाहिर रझा आणि समय श्रीवास्तव यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ओमान संघानं जिंकला सामना : प्रत्युत्तरात 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान संघानं 24.1 षटकांत 6 गडी गमावून 79 धावा केल्या आणि सामना जिंकला. ओमानसाठी आमिर कलीमनं सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी हम्माद मिर्झानं 20 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे, यूएईसाठी बासिल हमीदनं सर्वाधिक 3 आणि अयान खाननं 2 विकेट घेतल्या, परंतु ते संघाच्या विजयासाठी पुरेसं नव्हतं.
हेही वाचा :