गिनी 100 People Killed During Football Match : पश्चिम आफ्रिकी देश गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार झाला आहे. या सामन्यात चाहते आपापसात भिडले, ज्यात तब्बल 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामुळं क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
Many feared dead due to violence after a football match in guinea . pic.twitter.com/1vNVxhvxkz
— Abhishek Kumar Singh🇮🇳🇮🇳 (@Abhishe9828896) December 2, 2024
नेमकं काय घडलं : रविवारी गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर एन'जारेकोर इथं फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या संघर्षात डझनभर लोक ठार झाले आहेत, असं स्थानिक रुग्णालयाच्या सूत्रांनी एएफपीला सांगितलं. तसंच नाव न सांगण्याच्या अटीवर एका डॉक्टरनं सांगितलं की, "डोळ्याची नजर जाईपर्यंत रुग्णालयात मृतदेहांच्या रांगा आहेत. कॉरिडॉरमध्ये अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले आहेत, शवगृह तुडुंब भरलं आहे."
⚠️🔞 WARNING: GRAPHIC 18+ 🔞⚠️
— 🔥🗞The Informant (@theinformant_x) December 2, 2024
❗️🇬🇳 - At least 100 people lost their lives in violent clashes between rival fans during a football match in N'zerekore, Guinea.
This tragic event, which occurred at the end of a game, resulted in hundreds of fatalities. Medical sources confirmed… pic.twitter.com/xV3COoViUE
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंची पुष्टी होऊ शकली नाही. व्हिडिओमध्ये सामन्याच्या बाहेरील रस्त्यावर गोंधळाचं वातावरण दिसत आहे. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, संतप्त आंदोलकांनी एन'जारेकोर पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली.
🚨#BREAKING: At least 100 people have died due to clashes between two groups of supporters at a football match in Guinea. pic.twitter.com/Wbk34YCyNI
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 1, 2024
कशावरुन झाला हिंसाचार : फुटबॉल सामन्यादरम्यान मॅच रेफरीनं वादग्रस्त निर्णय दिल्यानंतर हिंसाचार सुरु झाला, असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. यानंतर चाहते संतप्त झाले आणि त्यानंतर खूप हिंसाचार झाला.'' स्थानिक मीडियाच्या मते, हा सामना गिनीचा जंटा नेता मामादी डुंबौया यांच्या सन्मानार्थ आयोजित स्पर्धेचा भाग होता. 2021 च्या सत्तापालटात डुम्बौयानं सत्ता हस्तगत केली आणि स्वत: ला अध्यक्ष म्हणून स्थापित केलं होतं. पश्चिम आफ्रिकन देशात अशा स्पर्धा सामान्य झाल्या आहेत. डुंबौयाची दृष्टी पुढील वर्षीच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यावर आणि राजकीय युती करण्यावर आहे.
Many feared dead due to violence after a football match in guinea . pic.twitter.com/1vNVxhvxkz
— Abhishek Kumar Singh🇮🇳🇮🇳 (@Abhishe9828896) December 2, 2024
डुंबौया यांनी राष्ट्रपतींना जबरदस्तीनं हटवलं होतं : सप्टेंबर 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांची हकालपट्टी करुन डुंबौयानं बळजबरीनं सत्ता काबीज केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अल्फानंच डुंबौयाला कर्नल पदावर बसवलं होतं जेणेकरुन तो राज्याचं आणि त्यांना अशा बंडापासून वाचवण्यासाठी काम करेल. यानंतर, आंतरराष्ट्रीय दबावाखाली, डुंबौया यांनी 2024 च्या अखेरीस पुन्हा नागरी सरकारकडं सत्ता सोपवण्याचं आश्वासन दिलं, परंतु आता त्यांनी आपण तसं करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :