अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना बोलावण्यात आलंय. यामध्ये राजकारणी, अभिनेते, क्रीडापटू आणि उद्योगपतींचा समावेश आहे.
अनेक स्टार खेळाडूंना आमंत्रण : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, 'स्प्रिंट क्वीन' पीटी उषा आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांच्यासह अनेक स्टार खेळाडूंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलंय. या व्यतिरिक्त या यादीत टीम इंडियाचा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव, लिटल मास्टर सुनील गावसकर, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमासाठी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनाही आमंत्रित करण्यात आलंय.
ऑलिम्पिकपटूंनाही आमंत्रण : याशिवाय वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, धावपटू कविता राऊत आणि पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. महिला क्रिकेटपटू मिताली राज, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही आमंत्रण मिळालंय. मात्र, यांच्यापैकी कोण या सोहळ्याला उपस्थित राहणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या खेळाडूंना आमंत्रण मिळालं
- सचिन तेंडुलकर - माजी क्रिकेटपटू
- कपिल देव - माजी क्रिकेटपटू
- सुनील गावसकर - माजी क्रिकेटपटू
- महेंद्रसिंह धोनी - माजी क्रिकेटपटू
- सौरव गांगुली - माजी क्रिकेटपटू
- अनिल कुंबळे - माजी क्रिकेटपटू
- हरभजन सिंग - माजी क्रिकेटपटू
- वीरेंद्र सेहवाग - माजी क्रिकेटपटू
- राहुल द्रविड - माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
- विराट कोहली - क्रिकेटपटू
- रवींद्र जडेजा - क्रिकेटपटू
- रोहित शर्मा - क्रिकेटपटू
- रविचंद्रन अश्विन - क्रिकेटपटू
- मिताली राज - क्रिकेटपटू
- विश्वनाथन आनंद - बुद्धिबळपटू
- पीटी उषा - धावपटू
- कविता राऊत धावपटू
- बायचुंग भुतिया - फुटबॉलपटू
- कल्याण चौबे - फुटबॉलपटू
- कर्णम मल्लेश्वरी - वेटलिफ्टर
- भालाफेक - देवेंद्र झाझरिया
- सायना नेहवाल - बॅडमिंटनपटू
- पीव्ही सिंधू - बॅडमिंटनपटू
- पुलेला गोपीचंद - बॅडमिंटन प्रशिक्षक
हे वाचलंत का :