कोलकाता IPL 2024 KKR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 42व्या सामन्यात पंजाब किंग्जनं (PBKS) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) आठ गडी राखून दारुण पराभव केला. शुक्रवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकातानं पंजाबला विजयासाठी 262 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी 8 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. टी-20 क्रिकेट आणि आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग होता. चालू मोसमात पंजाब किंग्जचा 9 सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला. तर दुसरीकडं, केकेआरचा हा आठ सामन्यांमधला तिसरा पराभव ठरलाय.
पंजाबचा ऐतिहासिक विजय : पंजाब किंग्जच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो जॉनी बेअरस्टो ठरला. बेअरस्टोनं 48 चेंडूत 9 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 108 धावा केल्या. शशांक सिंगनंही अवघ्या 28 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. शशांकनं आपल्या खेळीत आठ षटकार आणि दोन चौकार लगावले. 'इम्पॅक्ट प्लेयर' प्रभसिमरन सिंगनं अवघ्या 20 चेंडूत 54 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. प्रभसिमरन आणि बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 6 षटकांतच 93 धावांची भागीदारी झाली. ज्यामुळं पंजाबच्या धावसंख्येला गती मिळाली.
कोलकातानं उभारला धावांचा डोंगर : तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं 20 षटकात 6 गडी गमावून 261 धावांचा डोंगर उभारला. कोलकाताकडून फिल सॉल्टनं 37 चेंडूत 75 धावांची सर्वाधिक खेळी केली. यात सॉल्टनं सहा षटकार आणि तेवढेच चौकार मारले. तर सुनील नरेननंही 71 धावा केल्या. नरेननं 32 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि चार षटकार मारले. नरेन-सॉल्ट यांनी मिळून 10.2 षटकांतच 138 धावांची सलामी दिली. व्यंकटेश अय्यरनंही 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आक्रमक 39 धावा केल्या. याशिवाय आंद्रे रसेल (24) आणि श्रेयस अय्यर (28) यांनीही तुफानी खेळी केली. तर पंजाबकडून अर्शदीप सिंगनं सर्वाधिक दोन बळी घेतले.
फलंदाजीचे सर्व विक्रम उद्धवस्त : टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेस शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात 38.4 षटकातच 523 धावांचा पाऊस पडला. 45 चेंडूमध्ये शतक पाहायला मिळालं. त्याशिवाय या सामन्यात चार वेगवान अर्धशतकंही झाली. 18, 23, 23 आणि 25 चेंडूमध्ये चार अर्धशतकं झाली. 42 षटकार आणि 37 चौकार या सामन्यात पाहायला मिळाले. आयपीएलच्या इतिहासातील एखाद्या सामन्यातील हे सर्वाधिक षटकार आहेत.
पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग :
- 262 - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, आयपीएल 2024
- 259 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
- 253 - मिडिलसेक्स विरुद्ध सरे, ओव्हल, इंग्लंड टी-20 ब्लास्ट, 2023
- 244 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, 2018
- 243 - बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, 2022
आयपीएलमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग :
- 262 - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, 2024
- 224 - राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शारजाह, 2020
- 224 - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, 2024
- 219 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, 2021
टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार :
- 42 - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, कोलकाता, आयपीएल 2024
- 38 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, आयपीएल 2024
- 38 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरु, आयपीएल 2024
- 37 - बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल जवानन, शारजाह, एपीएल 2018/19
एका आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा :
- 549 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरु, 2024
- 523 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
- 523 - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, कोलकाता, 2024
- 469 - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई, 2010
- 465 - दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, 2024
आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार :
- 24 - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, 2024
- 22 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, बेंगळुरु, 2024
- 22 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स, दिल्ली, 2024
- 21 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, 2013
हेही वाचा :