कोलकाता : KKR vs LSG live Score IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात फिल सॉल्टच्या स्फोटक 89 धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं 26 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. कोलकाता नाईट रायडर्सनं 15.4 षटकांत दोन गडी गमावून 162 धावा केल्या.
फिल सॉल्ट पाडला धावांचा पाऊस : 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सुनील नरेनला केवळ 6 धावा करता आल्या. रघुवंशी 6 चेंडूत सात धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्टनं डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी झाली. फिल सॉल्ट 47 चेंडूत 89 धावा करून नाबाद परतला, तर श्रेयस अय्यर 38 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहीला. लखनऊकडून मोहसीन खाननं दोन गडी बाद केले.
लखनऊ सुरवात खराब : प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघानं 20 षटकात 7 गडी गमावून 161 धावा केल्या. लखनऊसाठी निकोलस पुरननं 32 चेंडूत सर्वाधिक 45 धावा केल्या. कोलकाताकडून मिचेल स्टार्कनं तीन बळी घेतले. प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघानं दुसऱ्याच षटकात सलामीवीर क्विंटन डी कॉकची (10) विकेट गमावली. दीपक हुड्डा 10 चेंडूत केवळ आठ धावा करू शकला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल 27 चेंडूत 39 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्कस स्टाइनिसने 5 चेंडूत 10 धावा केल्या. आयुष बडोनीने 27 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. निकोलस पूरन 32 चेंडूत 45 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रुणाल पंड्या सात धावा करून नाबाद राहिला.
दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सनं IPL 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. संघानं पहिले तीन सामने जिंकले आहेत, पण चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागलाय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडं, लखनौ सुपर जायंट्सनं पाच सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यांना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौचा संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग : 11
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, शामर जोसेफ, मोहसिन खान.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग : 11
फिलिप सॉल्ट (w), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार ), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.